शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

सातारा जिल्हा परिषदेचे बनावट नियुक्तीपत्र, दोघांची फसवणूक; पिंपरी येथील रोहित ऊर्फ सागर पवार गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 12:08 IST

रहिमतपूर : सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पदावर नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन दोन युवकांची ३ लाख रुपयांची फसवणूक ...

रहिमतपूर : सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पदावर नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन दोन युवकांची ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी येथील दोघांवर रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार याला अटक करण्यात आली आहे.रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार (वय ४०) व निहाल इनामदार (दोघेही रा. पिंपरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.सुमन नामदेव तावरे (रा. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी दिलेले फिर्यादीत म्हटले आहे की, माझा भाचा गणेश महादेव तावरे याला नोकरी नसल्याने त्याचे लग्न होत नव्हते. मैत्रिणीच्या सांगण्यावरून पिंपरी येथील ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याकडे भाच्याचे लग्न जुळवण्यासाठी संपर्क साधला. लग्नाबाबत चर्चा करताना ज्ञानेश्वर साळुंखे यांनी माझा मित्र रोहित ऊर्फ सागर पवार हा शासकीय नोकरी लावत असल्याचे सांगितले. साळुंखे यांच्या माध्यमातूनच २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी येथे रोहित पवार याच्याशी भेट झाली. त्याने एकाला सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य खात्यात नोकरी लावण्यासाठी दीड लाख रुपये लागत असल्याचे सांगितले. माझा भाचा गणेश महादेव तावरे व दुसरा भाचा महेश महादेव तावरे या दोघांना नोकरी लावण्यासाठी वेळोवेळी तीन लाख रुपये रोहित पवार याला दिले. ४ एप्रिल २०२२ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरात आम्हाला बोलावून रोहित पवार याने त्याचा सहकारी निहाल इनामदार याच्या हस्ते गणेश तावरे व महेश तावरे या दोघांचेही सातारा जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पदावरील नियुक्तीपत्र दिले. २० मे २०२२ रोजी सातारा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील टेबल नंबर ५ ला सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे नियुक्तीपत्रकात उल्लेख केला होता. मात्र, नियुक्तीपत्रावर हजर राहण्याच्या दिलेल्या तारखेच्या आठ दिवस अगोदर रोहित पवार याने फोन करून जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रियेवर स्टे आल्याचे सांगितले. तसेच स्टे उठल्यानंतर नवीन नियुक्तीपत्रक देणार असल्याचे सांगून जिल्हा परिषदेत जाऊ नका, असे सांगितले. यानंतर वारंवार रोहित पवार याला फोन करून नियुक्तीपत्र कधी देणार, अशी विचारणा केली असता त्याने वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरूनच त्याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने रहिमतपूर पोलिस ठाण्यात रोहित पवार व त्याचा सहकारी निहाल इनामदार या दोघांविरोधात १९ मे २०२४ रोजी तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने रोहित ऊर्फ सागर पवार याला अटक केली असून, निहाल इनामदार याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास रहिमतपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव विभुते करत आहेत.

रोहित पवारवर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे..संशयित रोहित पवार व निहाल इनामदार यांनी जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक या पदावर नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन यापूर्वी गणेश भोसले (रा. वेळू, ता. कोरेगाव) याच्याकडून ऑगस्ट २०२१ ते २२ एप्रिल २०२२ या दरम्यान दीड लाख रुपये घेऊन नियुक्तीचे बनावट पत्र देऊन फसवणूक केली होती. तसेच साप (ता. कोरेगाव) येथील सत्यम अडसुळे या युवकालाही आरोग्य सेवक पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपये घेतले होते. बेलेवाडी, ता. कोरेगाव येथील आकाश मोहिते या युवकालाही जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केली आहे. संशयित रोहित पवार याला अशाच प्रकरणांमध्ये उंब्रज पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस