शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

परदेशी पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान धोक्यात-अभयारण्याची अधिसूचना प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 21:20 IST

पांढऱ्या रंगाच्या-अग्निपंखांच्या फ्लेमिंगोसह काही डझन परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणाºया मायणी पक्षी अभयारण्याची अंतिम अधिसूचना अद्याप निघालेली नाही. मायणीसह जवळच असलेल्या येराळवाडी तलावाकडे दुर्लक्ष होत

ठळक मुद्देमायणीकडे परदेशी पक्ष्यांनी फिरवली पाठ; अन्नसाखळी नष्ट

प्रगती जाधव-पाटील।सातारा : पांढऱ्या रंगाच्या-अग्निपंखांच्या फ्लेमिंगोसह काही डझन परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणाºया मायणी पक्षी अभयारण्याची अंतिम अधिसूचना अद्याप निघालेली नाही. मायणीसह जवळच असलेल्या येराळवाडी तलावाकडे दुर्लक्ष होत असून, मानवी हस्तक्षेपामुळे देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची ही आश्रयस्थाने इतिहासजमा होण्याची भीती आहे. मायणी तलावाकडे गेल्या काही वर्षांत या पक्ष्यांनी फिरवलेली पाठ ही धोक्याची घंटा ठरली आहे.

दि. २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ (वेटलँड डे) दिन म्हणून साजरा केला जातो. अतिशित प्रदेशातून हिवाळ्यात भारतात स्थलांतरित होणाºया पाणपक्ष्यांचा अधिवास असलेले मायणी व येराळवाडी तलाव परिसर संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. शनिवारी साजºया होणाºया जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने शासनाने या दोन्ही तलावांकडे लक्ष देऊन त्यांचा ºहास थांबवावा. २५ वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या अभयारण्याची अंतिम अधिसूचना अद्याप न निघाल्याने तेथील मानवी हस्तक्षेप रोखून पक्ष्यांचा अधिवास जपण्याची गरज आहे. तसे न झाल्याने गेल्या काही वर्षांमध्ये मायणी तलावाकडे परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे.

मायणी तलावातील वाढत्या मानवी हस्तक्षेपाबाबत बोलताना साताºयातील ड्रोंगो या पर्यावरणप्रेमी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे म्हणाले, ‘मायणीत बेसुमार गाळाचे उत्खनन झाले. विटा व इतर कारणांसाठी या तलावातील गाळाची माती काढली गेली. वेडीबाभूळ व बेशरम या वनस्पतींच्या अतिक्रमणामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागली. उथळ पाण्यामध्ये उंचवट्यांवर सुरक्षित ठिकाणी हे पक्षी बसतात. उत्खननामुळे या पक्ष्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली. त्यांची बेशरम वनस्पती व खोल पाण्यामुळे या पक्ष्यांची अन्नसाखळी धोक्यात आली. परिणामी असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने परदेशी पाणपक्ष्यांनी मायणीजवळ अनुकूल अधिवास शोधण्यास सुरुवात केली. मायणी तलावाप्रमाणे येराळवाडी तलावात होऊ पाहत असलेला मानवी हस्तक्षेप वेळीच रोखण्याची गरज आहे. त्यामुळे मायणीसह येराळवाडी हे दोन्ही तलाव परिसर पक्षी अभयारण्य म्हणून संरक्षित व्हावा.’

‘रामसर’ या पाणथळ पक्ष्यांचे सर्वेक्षण करणाºया संस्थेने मायणी पक्षी अभयारण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. मात्र इंदिरा गांधींच्या नावाने जाहीर झालेल्या या पक्षी अभयारण्याची अंतिम अधिसूचना न निघाल्याने या अभयारण्याला कोणताही वैधानिक दर्जा नाही.रशिया, सायबेरीया, युरोप देशांतून स्थलांतरसातारा जिल्ह्यातील मायणी-येराळवाडी तलाव परिसर सध्या पाणपक्ष्यांनी बहरला आहे. हिवाळ्याचा मोसम हा या परदेशी पाहुण्यांचा जिल्ह्यात आगमन आणि रहिवासाचा काळ असतो. रशिया, सायबेरीया तसेच युरोपीय देशांतून हे पक्षी येथे स्थलांतर करतात. थंडी संपत आली की हे पाहुणे पुन्हा मायदेशी परततात. आपल्या देशात गेल्यानंतर ते प्रजनन करतात. या ठिकाणी फ्लेमिंगोसह, युरेशीयन डक, कॉमनकुट (वारकरी), पेन्टेड स्टार्क, नॉदर्न शावलर (थापट्या बदक), तसेच भारतीय पाणपक्ष्यांमध्ये अडई, टिबुकली, विविध करकोचे, शेराटी, पानकावळा, तुतारी, नदीसुरय यासह विविध प्रवासी पक्ष्यांचा अधिवास असतो. 

मायणीसह येराळवाडी पक्षी अभयारण्य विकसित झाल्यास निसर्ग पर्यटनाचे एक वेगळे ठिकाण निर्माण होईल. त्यातून निर्माण होणाºया पक्षीनिरीक्षण पर्यटनातून स्थानिकांचा शाश्वत विकासात निश्चित हातभार लागेल.- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा.खटाव तालुक्यातील मायणी तलावात दरवर्षी परदेशी पक्षी येत असत; परंतु अलीकडील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गाळाचे उपसा केला जात असल्याने त्यांचे आश्रयस्थान धोक्यात आले आहे. साहजिकच त्यांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर