शहरं
Join us  
Trending Stories
1
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
2
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
3
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
4
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
5
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
6
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
7
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
8
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
9
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
10
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
11
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
12
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
13
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
14
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
16
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
17
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
18
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
19
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
20
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कऱ्हाडात दुचाकीमध्ये आढळली स्फोटके, बॉम्बनाशक पथकाने दुचाकीसह स्फोटके केली नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 16:59 IST

एटीएममध्ये जिलेटीनच्या कांड्या घालून पोलीस आल्यानंतर तेथून पसार झालेल्या तीन आरोपींचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत

संजय पाटीलकऱ्हाड : शहरानजीक डोंगर पायथ्याला बेवारस स्थितीत आढळलेल्या दुचाकीत मोठ्या प्रमाणावर स्फोटके आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाने पाहणी केल्यानंतर ही स्फोटके सुरक्षितरीत्या निष्क्रिय करणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुरुवारी दुपारी परिसर निर्मनुष्य करून दुचाकीतच स्फोटकांचा स्फोट करून ती नष्ट करण्यात आली.कऱ्हाडनजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीत सोमवारी पहाटे चोरट्यांनी जिलेटीनचा स्फोट करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांची पोलिसांशीही झटापट झाली होती. पोलिसांवर हल्ला करून तीन चोरटे पसार झाले होते. तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच चोरट्यांनी एटीएममध्ये लावलेली स्फोटके त्याचठिकाणी स्फोट करून नष्ट करण्यात आली होती. पोलिसांवर हल्ला करून पळून गेलेल्या तिन्ही चोरट्यांचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत. त्यातच करवडी येथे निर्जनस्थळी बुधवारी रात्री एक बेवारस दुचाकी आढळून आली.संबंधित दुचाकी एटीएम चोरीतील आरोपींची असल्याची खात्री पोलिसांना पटली. मात्र, दुचाकीच्या डिकीमध्ये स्फोटके असल्यामुळे पोलिसांनी ती दुचाकी त्याचठिकाणी ठेवली. रात्रभर पोलिसांनी त्याठिकाणी पहारा दिला. त्यानंतर गुरुवारी सकाळी बॉम्बशोधक व नाशक पथकाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. या पथकाने दुचाकीची तपासणी केली असता डिकीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटके आढळली.स्फोटके डिकीतून बाहेर काढताना त्याचा स्फोट होण्याची शक्यता होती. त्यामुळे धोका न पत्करता हा परिसर निर्मनुष्य करून बॉम्बशोधक व नाशक पथकाने दुपारी दुचाकीतच त्या स्फोटकांचा स्फोट केला. या स्फोटात दुचाकीच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यावेळी मोठा आवाज झाल्यामुळे परिसरही हादरून गेला.आरोपींचा शोध सुरूचएटीएममध्ये जिलेटीनच्या कांड्या घालून पोलीस आल्यानंतर तेथून पसार झालेल्या तीन आरोपींचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत. बुधवारी सायंकाळी हे आरोपी करवडी परिसरातील डोंगरात काही गुराख्यांना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुरुवारी दिवसभर आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी डोंगर पिंजून काढला. मात्र, आरोपी हाती लागलेले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीBlastस्फोट