जागितक योग दिवसानिमित्त मयुरेश्वर ग्रुपकडून व्यायामाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:51+5:302021-06-22T04:25:51+5:30
लोणंद : जागतिक योग दिवसानिमित्त मयुरेश्वर ग्रुपच्या वतीने लोणंद वीर सायकल प्रवास करून व्यायामाचा संदेश दिला. लोणंदमधील मयुरेश्वर ग्रुपच्या ...

जागितक योग दिवसानिमित्त मयुरेश्वर ग्रुपकडून व्यायामाचा संदेश
लोणंद : जागतिक योग दिवसानिमित्त मयुरेश्वर ग्रुपच्या वतीने लोणंद वीर सायकल प्रवास करून व्यायामाचा संदेश दिला. लोणंदमधील मयुरेश्वर ग्रुपच्या वतीने गेली दोन वर्षे सातत्याने सायकलिंग रनिंगच्या माध्यमातून व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले जात आहे. मंडळातील युवकांनी अनेक विक्रमही केले आहेत. जागतिक योगा दिनाच्या निमिताने ग्रुपच्या वतीने सकाळी लोणंद ते वीर व पुन्हा लोणंद असा सायकलप्रवास करत व्यायामाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना पालखीतळावर श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी ग्रुपचे अध्यक्ष दिलीप तेलकर, उपाध्यक्ष विठ्ठल टेंगले, गजेंद्र मुसळे, राजेंद्र सरक, राजेंद्र धायगुडे, बाळासाहेब शेळके, सचिन भांगरे, अजित शेळके, संतोष धायगुडे, दत्तात्रय भोईटे, भावेश दोशी, धनराज वाघमारे, अजित माने, गणेश दहिवळ, किरण शिंदे, वेदांत धायगुडे, अभिनव सरक, आयुष टेंगले यांनी सहभाग घेतला.