The excuses of the photo lengthened the chain of aging | फोटोच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील चेन लांबविली
फोटोच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील चेन लांबविली

ठळक मुद्देफोटोच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील चेन लांबविलीसातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

सातारा : वृद्धेच्या गळ्यातील चेनचा फोटो काढण्याचा बहाणा करून दोघाजणांनी अडीच तोळ्याची चेन चोरून नेल्याची घटना साईबाबा मंदिर परिसरात दि, १० रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

दमयंती भिमराव पोतदार (वय ६६, रा. शिवनगर प्लॉट नवीन एमआयडीसी, सातारा) यांच्या घरी दि. १० रोजी सकाळी दुधाचा चिक विकण्याचा बहाण करून दोन युवक आले. त्यापैकी एकाने पोतदार यांना माझ्या आजीला तुमच्या गळ्यात जशी सोन्याची चेन आहे.

तशीच बनवायची आहे. तुम्ही गळ्यातून चेन काढून द्या, मी तिचा फोटो काढून घेऊन तुम्हाला ती माघारी देतो, असे म्हणून पोतदार यांच्याकडून त्यांनी सोन्याची चेन घेतली.

मात्र, चेन परत न देता दोघांनीही दुचाकीवरून पलायन केले. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Web Title: The excuses of the photo lengthened the chain of aging
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.