मलकापूर इनरव्हील क्लबच्या निवडी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST2021-07-01T04:26:25+5:302021-07-01T04:26:25+5:30

मलकापूर येथील छाया शेवाळे यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. इनरव्हील क्लब कराड ...

Excitement over the selection of Malkapur Inner Wheel Club | मलकापूर इनरव्हील क्लबच्या निवडी उत्साहात

मलकापूर इनरव्हील क्लबच्या निवडी उत्साहात

मलकापूर येथील छाया शेवाळे यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. इनरव्हील क्लब कराड संगममध्येही त्या कार्यरत होत्या. मात्र, कऱ्हाड आणि मलकापूर या दोन्ही शहरांची वाढती व्याप्ती, स्वत: मलकापूर येथील रहिवासी असल्याने व तेथील महिलांनाही सामाजिक कार्य करण्याची संधी मिळावी, या हेतूने मलकापूरसाठी स्वतंत्र क्लब स्थापन करण्याचा संकल्प केला. त्यानंतर त्यांनी ‘इनरव्हील डिस्ट्रिक ३१३’ च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन आणि मलकापूरमधील महिलांचे संघटन करून क्लबची स्थापना केली.

क्लब स्थापना समारंभ जिल्हाध्यक्ष अनुराधा चांडक, इएसओ चारुलता चिंचणकर, शोभना पालकर, रचना मालपाणी, गीता मामनीया, मलकापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष सलील मुजावर, सचिव प्रवीण जाधव आदींच्या उपस्थितीत पार पडला. रोटरी चार्टर प्रेसिडेंट विजय चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी क्लबच्या प्रथम अध्यक्षपदी शेवाळे, सचिवपदी पवार, ट्रेझररपदी मेघा नलवडे, आयएसओपदी सारिका वेल्हाळ, एडिटरपदी सुनीता पाटील, उपाध्यक्षपदी पद्मावती जाधव, जॉइंट सेक्रेटरीपदी डॉ. वीणा जाधव आदी सदस्यांची निवड करण्यात आली.

फोटो : ३०छाया शेवाळे

Web Title: Excitement over the selection of Malkapur Inner Wheel Club