शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अतिरिक्त पाणी माण-खटावकडे सोडावे :पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:08 IST

उरमोडी धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केली.

ठळक मुद्देअतिरिक्त पाणी माण-खटावकडे सोडावे :पालकमंत्रीसातारा-सांगली सिंचन विभागाने समन्वय ठेवून कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना

सातारा : उरमोडी धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केली.कालवा सल्लागार समितीची बैठक सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मिसाळ, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अरुण लाड यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले,सातारा व सांगली जिल्ह्यातील सिंचन विभागांनी आपापसात समन्वय ठेवून प्रकल्पीय तरतुदीनुसार सातारा व सांगली जिल्ह्यातील कालव्यांना योग्य वेळी पाणी सोडावे, कोणत्याही लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे, यापुढे असाच पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, सातारा, सांगली जिल्ह्यातील कुठल्याही लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे आवर्तनाचे नियोजन करावे. प्रकल्पीय तरतुदीनुसार कोट्यानुसार प्रत्येक भागाला पाणी दिले जावे, असेही पालकमंत्री पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेवटी सांगितले.सांगलीसाठी १ सप्टेंबरपासून आवर्तन१ सप्टेंबरपासून ठरवून दिल्याप्रमाणे सांगलीसाठी आवर्तन सुरु करावे. तसेच सातारा तालुक्यातील रखडलेल्या सिंचनाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी