पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेले कास धरण यंदाच्या वर्षी गुरुवार, दि. १९ जूनला पूर्ण क्षमतेने भरले होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाने धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या क्षमतेने वाहणारे पाणी गेल्या साडेतीन महिन्यांपासून म्हणजेच सलग ११० दिवस वाहतानाचे मनमोहक चित्र पाहावयास मिळत आहे.कास परिसरातील अधूनमधून पावसाची संततधार व गेल्या पावणेचार महिन्यापासून सलग ओव्हरफ्लो झाले. कास धरणामुळे देशातील एक नंबरचा भांबवली येथील वजराई धबधबादेखील मोठ्या प्रमाणावर कोसळतानाचे चित्र होते. यावर्षी जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावत पडलेल्या मुसळधार पावसातच धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. दरम्यान, कास धरण १९ जूनला ओव्हरफ्लो झाले.यावर्षी जूनमध्ये मान्सूनपूर्व पावसाने कास परिसरात चांगली हजेरी लावली होती. यामुळे सलग दहा-बारा दिवसांच्या जोरदार पावसामुळे कास धरण १९ जूनला पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. १९ जूनपासून आजवर देखील सलग साडेतीन महिन्यांपासून कास धरणाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहतच आहे. सततच्या रिमझिम पावसाने सड्यावरून कोसळणारे पाणी यामुळे कास धरणात पाणीसाठा होऊन सद्य:स्थितीला सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी सतत वाहत आहे. तसेच धुकेदेखील मोठ्या प्रमाणावर पडत आहे.हिरवागार निसर्ग वेधतोय पर्यटकांचे लक्षहिरवागार निसर्ग, दाट धुक्याची दुलई त्यात रिमझिम पडणारा पाऊस नेहमीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. या नयनरम्य निसर्गात आणखी भर टाकणारा कास धरणाचा सांडवा. सांडव्यावरून वाहणारे पाणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी दरवर्षी पर्यटक परिसरात पर्यटनाला पसंती देत असतात.
दहा वर्षांतील आकडेवारी२०१५ : २३ जून२०१६ : ३ जुलै२०१७ : ३० जूनला२०१८ : ५जुलै२०१९ : ६जुलै२०२० : ४ जुलै२०२१ : १७ जून२०२२ : १५ जुलै२०२३ : २४ जुलै२०२४ : ७ जुलै
१९ जूनला कास धरण ओव्हरफ्लो झाले. गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाची रिमझिम सतत सुरू आहे. तसेच उरमोडी नदीचा उगम व तलावातील पुष्कळ झऱ्यामुळे आजमितीलादेखील सलग ११० दिवस कास धरणाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहत आहे. पूर्णपणे पाऊस उघडल्यानंतर साधारण आठ-दहा दिवसांनंतर सांडव्यावरून वाहणारे पाणी थांबते. - जयराम कीर्दत, पाटकरी. कास धरण
Web Summary : Kas Dam overflows for 110 days, a spectacle since June 19th. The continuous overflow, lush greenery, and fog attract many tourists. The dam reached capacity due to heavy pre-monsoon showers and constant rain, creating a picturesque scene.
Web Summary : सतारा का कास बांध 110 दिनों से बह रहा है, जो 19 जून से शुरू हुआ। लगातार अतिप्रवाह, हरियाली और कोहरा पर्यटकों को आकर्षित करते हैं। भारी प्री-मानसून बारिश और निरंतर वर्षा के कारण बांध क्षमता तक पहुंच गया।