शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर कमी, तरी धरणांत पाण्याची आवक कायम; सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पात १०२ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:20 IST

कोयना, नवजा येथे किती झाला पाऊस.. 

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी प्रमुख धरणांत पाण्याची आवक कायम आहे. यामुळे कोयनासह प्रमुख सहा प्रकल्पांत १०२ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे. सध्या ही धरणे सुमारे ६९ टक्के भरलीत. यामुळे चिंता मिटलेली आहे. तर २४ तासात कोयनेला ४२ आणि नवजा येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यांपासून पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे पश्चिम भाग आबादाणी झाला आहे. तसेच पश्चिम भागातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. जून महिन्याच्या मध्यापासून पाऊस सुरू झाल्यापासून या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. बुधवारी सकाळच्या सुुमारास या धरणांमध्ये १०२.३६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. याची टक्केवारी ६८.८२ इतकी झाली आहे. कोयना धरणात ७१.१२ टीएमसी तर धोममध्ये ९.७०, बलकवडी २.०४, कण्हेर ७.४२, तारळी ४.९९ आणि उरमोडी धरणात ७.०९ टीएमसी पाणीसाठा होता. धोम ७२ तर तारळी धरण ८५ टक्के भरलेले आहे. त्याचबरोबर सध्या चार धरणांतून पाणी विसर्ग सुरूच आहे.बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग केला जात होता. तर कण्हेरमधून २ हजार ३१४, उरमोडी धरणातून १ हजार ८२८ आणि तारळीमधून २ हजार ३७७ क्यूसेक विसर्ग नदीपात्रात केला जात होता. यामुळे वेण्णा, तारळी आणि उरमोडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कोयनेला २१०६ मिलिमीटर पर्जन्यमान..जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्याने सवा महिना झाला आहे. तर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४२, नवजाला ३३ आणि महाबळेश्वर येथे २१ मिलिमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून कोयनेला २ हजार १०६, नवजा १ हजार ८९१ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार ९६१ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. बुधवारी सकाळी कोयना धरणात सुमारे १५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. पाणी आवक कमी झाली आहे. तर धरणात ७१.११ टीएमसी साठा झाला होता. ६७.५६ टक्के हा साठा आहे.