शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

आठवड्यानंतरही साताऱ्यात कांद्याला मिळतोय क्विंटलला चार हजारांचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 1:26 PM

onion Satara News-सातारा बाजार समितीत आठवड्यानंतरही कांद्याचा दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर मंडईबरोबरच इतर ठिकाणी कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये किलोने होत आहे. कांद्याचा दर वाढल्याने सामान्यांना मात्र झळ बसत आहे.

ठळक मुद्देआठवड्यानंतरही साताऱ्यात कांद्याला मिळतोय क्विंटलला चार हजारांचा दर आवक वाढली : मंडईत ५० ते ६० रुपये किलो; सामान्यांना झळ

सातारा : सातारा बाजार समितीत आठवड्यानंतरही कांद्याचा दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर मंडईबरोबरच इतर ठिकाणी कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये किलोने होत आहे. कांद्याचा दर वाढल्याने सामान्यांना मात्र झळ बसत आहे.सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. सातारा, जावळी, कोरेगाव, खटाव, माण, वाई, फलटण या तालुक्यातून भाजीपाला व इतर माल येत असतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. दर गुरूवार आणि रविवारी मालाची अधिक आवक राहते.सातारा बाजार समितीत तीन महिन्यापूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर साडे सहा हजारांपर्यंत पोहोचला होता. तर भाजी मंडई, दुकानात कांद्याची किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये किलोने होत होती. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. पण, त्यानंतर कांद्याचा दर हळू-हळू कमी झाला. असे असतानाच दीड महिन्यापूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केली. त्यानंतर दरात सुधारणा झाली.सातारा बाजार समितीत जवळपास एक महिन्यापासून कांद्याला १ हजारापासून ३ हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळत होता. मात्र, त्यानंतर दरात सुधारणा झाली. ३२००, ३३०० तर काहीवेळा ३८०० रुपये क्विंटलर्यंत भाव आला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकºयांसाठी अच्छे दिन आले. असे असतानाच मागील आठवड्यापासून कांद्याचा दर ४ हजारांपर्यंत टिकून आहे. गुरूवारी ३८९ क्विंटलची आवक झाली तर क्विंटलला ४ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. एक नंबर कांद्याला ३ ते ४ आणि दोन नंबरच्या कांद्याला २ ते ३ हजारापर्यंत दर मिळाला. यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.सातारा बाजार समितीत गुरूवारी ५६ वाहनांतून ५२२ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. आवक चांगली असलीतरी अजुनही अनेक भाज्यांना चांगला दर मिळत नाही. गवारचा दर तेजीत निघाला. गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० भाव आला. वांग्याला १० किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. वांग्याचा भाव कमी झाल्याचे दिसून आले. टोमॅटो ५० ते ८०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजुनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० अन् दोडक्याला २५० ते ३०० रुपये दर आला.

बटाट्याला क्विंटलला ७०० पासून १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला २ ते ३ हजार रुपये भाव आला. आल्याला १ हजार १८०० रुपये दर मिळाला. लसणाला क्विंटलला ३ ते ७ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजुनही स्वस्त आहे. ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला. वाटाण्याचा भाव वाढत असल्याचे दिसून आले.पालेभाज्यांना भाव आला कमी...सातारा बाजार समितीत पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. पण, दरात सतत चढ-उतार सुरू आहे. गुरूवारी तर दर कमी झाला. मेथीच्या १५०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १७०० पेंडी आली. याला शेकडा दर अवघा ३०० ते ४०० रुपयांदरम्यान मिळाला. पालकला शेकडा ४०० ते ५०० रुपये भाव आला. 

टॅग्स :onionकांदाSatara areaसातारा परिसर