घरात घुसून अख्ख्या कुटुंबाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:12 IST2019-05-10T22:11:18+5:302019-05-10T22:12:28+5:30

जुन्या भांडणातून घरात घुसून अख्ख्या कुटुंबाला चौघाजणांनी बेदम मारहाण करून घरामध्ये तोडफोड केल्याची घटना यवतेश्वर, ता. सातारा येथे घडली.

Entry into the house hit the whole family | घरात घुसून अख्ख्या कुटुंबाला मारहाण

घरात घुसून अख्ख्या कुटुंबाला मारहाण

ठळक मुद्देपोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सातारा : जुन्या भांडणातून घरात घुसून अख्ख्या कुटुंबाला चौघाजणांनी बेदम मारहाण करून घरामध्ये तोडफोड केल्याची घटना यवतेश्वर, ता. सातारा येथे घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

विपूल कार्वे, प्रशांत कार्वे, विनोद कार्वे, येणुबाई कार्वे (रा. यवतेश्वर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अक्षय दिलीप धनवडे (वय २२, रा. यवतेश्वर, ता. सातारा) याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पूर्वीच्या भांडणातून वरील चौघांनी घरात घुसून अक्षय आणि त्याच्या आई, वडील, भाऊ, चुलत्यांना प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. तसेच घरातील खिडकीच्या काचा, कपाटाच्या काचा फोडून नुकसान केले. यावरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Entry into the house hit the whole family