नाल्यावर अतिक्रमण जमीन गेल्या वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:39+5:302021-06-22T04:25:39+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर वानरवाडी रस्त्याशेजारील नाल्यावर अतिक्रमण करून नाली बुजविण्यात आली आहेत. परिणामी डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे ...

नाल्यावर अतिक्रमण जमीन गेल्या वाहून
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर वानरवाडी रस्त्याशेजारील नाल्यावर अतिक्रमण करून नाली बुजविण्यात आली आहेत. परिणामी डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे प्रवाह बंद झाले. त्यामुळे पाणी शिवारात शिरून अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर संबंधित विभाग कारवाई करणार का? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
कुसूर-वानरवाडी रस्त्यालगत डोंगर पायथ्याला तारूख महसूल विभागाच्या अखत्यारीत एका शेतकऱ्याने शेत जमीन नव्याने तयार केली आहे. यावेळी संबंधित शेतकऱ्याने डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाहाचे ओढे बुजवून त्यावर अतिक्रमण करून जमीन तयार केली आहे. तर कुसूर-वानरवाडी रस्त्यालगत असलेली नाले ही बुजवून अतिक्रमण केले आहे. परिणामी डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने पावसाचे पाणी अन्य शेतात घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केलेले बियाणासह माती वाहून गेल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आहे. याला जबाबदार असणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांवर डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने व रस्त्याशेजारील नाली बुजवून अतिक्रमण केल्याने कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.