शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-कोल्हापूर पुणे डेमूला जोडले विद्युत इंजिन, अखेर रेल्वे प्रशासनाला जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:03 IST

प्रवाशांनी टाकला सुटकेचा नि:श्वास

कोरेगाव : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रवाशांची सर्वाधिक पसंती असलेल्या पुणे-कोल्हापूर-पुणे या फास्ट डेमूला अखेर विजेचे इंजिन जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सातत्याने ही डेमू प्रवासादरम्यान जागोजागी बंद पडत होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर प्रशासनाने विजेचे इंजिन जोडून ही डेमू चालविण्यास सुरुवात केली आहे. साताऱ्यातून रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही डेमू विजेचे इंजिन जोडून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली.कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर मार्गावर मध्य रेल्वेकडून डेमू चालविल्या जातात. त्यांपैकी निळा आणि गुलाबी रंग असलेली डेमू सातत्याने बंद पडण्याच्या तक्रारी वाढत होत्या. गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा ही डेमू प्रवासादरम्यान बंद पडली होती. मात्र तत्काळ दुरुस्ती होत नसल्याने प्रवाशांना एका जागी दोन-दोन तास ताटकळावे लागत होते. परिणामी पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या सेवेवरही विपरीत परिणाम होत होता.

लोकप्रतिनिधींसह रेल्वेच्या सल्लागार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी याविषयी मध्य रेल्वेच्या प्रशासनाला वारंवार विनंती केली होती; तसेच वेळप्रसंगी सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अवघ्या दोन दिवसांपूर्वी सातारा रेल्वे स्थानकावरून ही डेमू बंद पडली होती. पर्यायी इंजिन जोडून ती कोल्हापूरला पाठविली. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला होता.रेल्वे प्रशासनाने अखेरीस आता विजेचे इंजिन जोडून ही डेमू चालविण्याचा निर्णय घेतला असून, रविवारी सकाळी पुण्याहून नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ही डेमू कोल्हापूरकडे रवाना झाली.सातारा रेल्वेस्थानकावर दुपारी पावणेतीन वाजता ती दाखल झाली. तेथे निर्धारित वेळेत थांबा घेऊन ती कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. एकंदरीत मध्य रेल्वे प्रशासनाने उशिरा का होईना, तक्रारींची दखल घेतल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. या मार्गावर नव्या कोऱ्या आणि इलेक्ट्रिकल डेमू चालवाव्यात, अशी मागणी आता होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे