‘द बर्निंग टू व्हिलर’चा थरार; वाईत इलेक्ट्रिक दुचाकीने घेतला पेट

By दीपक शिंदे | Updated: November 23, 2023 19:39 IST2023-11-23T19:38:55+5:302023-11-23T19:39:38+5:30

वाई : वाई येथे गुरुवारी भरदुपारी ‘द बर्निंग टू व्हिलर’चा थरार पाहायला मिळाला. शिवाजी चौकात असणाऱ्या दामोदर आश्रमाशेजारी इलेक्ट्रिक ...

electric bike caught fire in wai satara | ‘द बर्निंग टू व्हिलर’चा थरार; वाईत इलेक्ट्रिक दुचाकीने घेतला पेट

‘द बर्निंग टू व्हिलर’चा थरार; वाईत इलेक्ट्रिक दुचाकीने घेतला पेट

वाई : वाई येथे गुरुवारी भरदुपारी ‘द बर्निंग टू व्हिलर’चा थरार पाहायला मिळाला. शिवाजी चौकात असणाऱ्या दामोदर आश्रमाशेजारी इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतल्याने मोठे नुकसान झाले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भिकू यशवंत यादव (रा. वागजाईवाडी) यांची (एमएच ११ डीई ६५८८) इलेक्ट्रिक दुचाकीने तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक पेट घेतला. यामध्ये दुचाकी पूर्णपणे जाळून खाक झाली. अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

वाई नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केल्याने त्याने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवत आग विझविली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. गाडीचे मात्र पूर्णपणे नुकसान झाले आहे. पेटत्या दुचाकीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

Web Title: electric bike caught fire in wai satara