शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अठरा हजार हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

By admin | Updated: July 2, 2017 16:36 IST

धोम-बलकवडी कालवा : अस्तरीकरणास प्रारंभ; १ हजार २९१ कोटींची तरतुद

आॅनलाईन लोकमतखंडाळा , दि. 0२ : खंडाळा तालुक्याला वरदान ठरलेल्या धोम बलकवडी कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अस्तरीकरणानंतर प्रवाही पाण्याचा वेग वाढणार असला तरी खंडाळा तालुक्याला मात्र यापुढे अधिकृत पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे शेती सिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी १ हजार २९१ कोटी रुपयांची चतुर्थ सुधारित मान्यता देण्यात आली आहे.

खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी टिळा कायमस्वरुपी पुसून धोम बलकवडी प्रकल्प तालुक्यासाठी वरदान ठरलेला आहे. या कालव्यामुळे जवळपास अर्ध्या तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. धरणाच्या निर्मितीपासून या कालव्याद्वारे तालुक्यात पाणी सोडण्यात येत आहे . कालव्यातून पाझर पध्दतीने ठिकठिकाणी पाणी वाहत असल्याने आजपर्यंत ऐन उन्हाळ्यातही माळरानातून पाणी वाहताना दिसत होते . या कालव्याद्वारे भोर तालुक्यातील १ हजार ५० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील ४ हजार ३०० हेक्टर व फलटण तालुक्यातील १२ हजार ७५० हेक्टर अशी एकूण १८ हजार १०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

धोम बलकवडी धरण व कालव्याची कामे पूर्ण करण्यासाठी ३० मे रोजी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जुन २०१८ पर्यंत कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करण्याचे आदेश जलसंधारण विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कामात वेग घेतला आहे. या कामानंतर खंडाळा तालुक्याला करारानुसार केवळ ०.६४ अघ फूट प्रवाही पाणीच वापरता येणार आहे. त्यामुळे या वषापार्सून शेतकाऱ्यांना पाणी साठवण व शेती सिंचनाचे योग्य नियोजन करावे लागेल.

निरा देवघरी कामे अपूर्ण...

धोम बलकवडी कालव्यासाठी प्रकल्प जलनियोजनातून २ .७० अ .घ . फूट पाणी सोडण्यात येते मात्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार निरा देवघर प्रकल्पातील ०.९३ अ. घ. फूट पाणी धोम बलकवडीच्या कालव्यात अतिरिक्त सोडण्यास मंजूरी दिली आहे . त्यामुळे एकूण ३ .६३ अ .घ . फूट पाणी वापर प्रस्तावित केला आहे . मात्र नीरा देवघरची कामे अपूर्ण ठेवून सुमारे एक टीएमसी पाणी धोम कालव्यात टाकण्याचा निर्णय घेतल्याने खंडाळा तालुक्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे .खंडाळा तालुक्याला धोम बलकवडी प्रकल्पाच्या पाण्याबरोबरच नीरा देवघरच्या पाण्याचा अधिक फायदा आहे . नीरा देवघर प्रकल्पाची मंजूरी अगोदरची असताना या कालव्याची कामे अपूर्ण ठेवून पाणी दुसरीकडे वापरायला देणे हे या प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकऱ्यांवर अन्याय आहे . शासनाच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. याही कालव्याची कामे पूर्ण करून हक्काचे पाणी खंडाळा तालुक्याला मिळाले पाहिजे.- अ?ॅड . बाळासाहेब बागवान,

अध्यक्ष पाणी पंचायत