टीव्ही चोरीप्रकरणी तीन युवकांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:22 PM2019-05-27T14:22:49+5:302019-05-27T14:24:05+5:30

पाचगणी, ता.महाबळेश्वर येथे बंद बंगल्यामधील टीव्ही चोरून नेल्याप्रकरणी तीन युवकांना महाबळेश्वर न्यायालयाने शिक्षा सुनावली.

Education for three youth in TV theft | टीव्ही चोरीप्रकरणी तीन युवकांना शिक्षा

टीव्ही चोरीप्रकरणी तीन युवकांना शिक्षा

Next
ठळक मुद्देटीव्ही चोरीप्रकरणी तीन युवकांना शिक्षाचोरीचा मुद्देमालही जप्त

पांचगणी : पाचगणी, ता.महाबळेश्वर येथे बंद बंगल्यामधील टीव्ही चोरून नेल्याप्रकरणी तीन युवकांना महाबळेश्वर न्यायालयाने शिक्षा सुनावली.

याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मे २०१८ मध्ये पाचगणी येथील तायघाट हद्दीतील एका बंद बंगल्यातून टीव्ही चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पाचगणीच्या सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला.

वेळी पोलिसांना अविनाश चंद्रकांत गोळे (वय २३, गणेशपेठ, ता.जावळी ), किरण चंद्रकांत बेलोशे (वय २५), गणेश जनार्दन बेलोशे (वय २२, रा. रुईघर, जावळी) यांनी ही चोरी केली असल्याचे तपासात समोर आले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी अविनाश गोळे, किरण बेलोशे या दोघांना एक वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी तर तिसरा आरोपी गणेश बेलोशे याला तीन महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड. हा दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने त्याला सुनावली.

Web Title: Education for three youth in TV theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.