शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पाणीसाठ्याला बाष्पीभवनाचे ग्रहण, सातारा  जिल्ह्यात पाणी-बाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 12:01 IST

सातारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून, तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात पाणीबाणी निर्माण झाली असल्याने दमदार उन्हाळी पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागून राहिली आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पाणीसाठ्याला बाष्पीभवनाचे ग्रहण, सातारा  जिल्ह्यात पाणी-बाणी दमदार उन्हाळी पावसाची प्रतीक्षा; धरणांतील पाणीसाठा घटला

सागर गुजरसातारा : जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून, तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात पाणीबाणी निर्माण झाली असल्याने दमदार उन्हाळी पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागून राहिली आहे.जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, धोम बलकवडी, तारळी, येरळवाडी या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. कण्हेर धरणातून उन्हाळीचे एक आवर्तन सध्या सुरू आहे. धोम धरणातील पाणीही आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उरमोडी धरण वगळता इतर धरणांतील पाणी अत्यल्प उरले आहे. येरळवाडी धरणातील पाणी संपले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील धरणांतून नद्यांत पाणी सुटले तरच नदीकाठच्या पाणी योजना सुस्थितीत चालू राहणार आहेत. मात्र, धरणांतील आवर्तने कमी झाल्याने पाणी योजनाही धोक्यात आल्या आहेत. काही गावांतील पाणी योजना बंद कराव्या लागल्या आहेत. तर बहुतांश गावांमध्ये एकाड-एक दिवस पिण्याचे पाणी सोडायला सुरुवात केली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळी भागाबरोबरच पश्चिमेकडील पाऊसमान चांगले असलेल्या पसिरातत राहणाऱ्या लोकांनाही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मे महिन्यात तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजडावा लागणार आहे.नांगरट जमिनींना तहान पाण्याचीरब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केल्या जातात. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरट केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. पाऊस पडेल, या भरवशावर शेतकऱ्यांनी शेती नांगरून ठेवल्या आहेत. नांगरट केलेल्या जमिनींना पाण्याची तहान लागली आहे.च्रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केल्या जातात. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरट केलेल्या जमिनीला फायदा होतो. पाऊस पडेल, या भरवशावर शेतकºयांनी शेती नांगरून ठेवल्या आहेत.धरणांची सद्य:स्थितीधरण         क्षमता        उपलब्ध पाणी (टीएमसी)             उपयुक्तकोयना         १०५                    ४४.७२                                   ३९.६०कण्हेर          ९.५९                    ३.६०                                      ३.१०धोम              ११.६९                 ३.२३                                     १.४२उरमोडी          ९.६५                   २.४८                                    २.१७बलकवडी        ३.९६                   ०.७१                                   ०.५९तारळी            ५.८४                    २.४३                                   २.४२येरळवाडी      ०.६९                     निरंक 

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर