शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवासात दहा तोळ्याचे दागिने लंपास, विवाह समारंभ पडला महागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:20 IST

विवाहाला जायचे असल्यामुळे दागिने तपासले असता दागिन्यांचा बॉक्स बॅगमध्ये नसल्याचे निदर्शनास आले

कऱ्हाड : नातेवाइकाच्या विवाहासाठी गावी आलेल्या महिलेचे दहा तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. स्वारगेट ते गिरेवाडी एसटी प्रवासादरम्यान ही घटना घडली. याबाबत भारती नवनाथ माने (रा. कोथरुड-पुणे, मुळ रा. गिरेवाडी, ता. पाटण) यांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरेवाडी येथील भारती माने या कुटुंबासह कोथरुड-पुणे येथे वास्तव्यास आहेत. १२ जून रोजी त्यांच्या एका नातेवाइकाचा गावी विवाह सोहळा होता. या विवाहासाठी ११ जून रोजी भारती माने या पती नवनाथ यांच्यासोबत गावी येण्यासाठी निघाल्या. स्वारगेट बसस्थानकातून त्या कोल्हापूर एसटीमध्ये बसल्या. विवाहात घालण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडील दहा तोळ्याचे दागिने एका बॅगमध्ये ठेवून त्या बॅगमध्ये दागिन्यांवर कपडे ठेवले होते. संबंधित बॅग त्यांनी प्रवासावेळी एसटीच्या रॅकमध्ये ठेवली होती. स्वारगेटमधून निघालेली एसटी दुपारी खंडाळा येथील एका हॉटेलवर थांबली. त्यावेळी भारती व पती नवनाथ हे दोघे जेवणासाठी एसटीतून उतरले. त्यानंतर एसटी पुन्हा मार्गस्थ झाली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उंब्रजमध्ये आल्यानंतर भारती व नवनाथ हे दोघेजण एसटीतून उतरले. तेथून ते दुसऱ्या एसटीने त्यांच्या गावी गिरेवाडी येथे पोहोचले. रात्री जेवण आटोपल्यानंतर कुटुंबीयांसमवेत ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी विवाहाला जायचे असल्यामुळे भारती यांनी कापडी बॅग उघडून त्यामध्ये असलेले दागिने तपासले असता दागिन्यांचा बॉक्स बॅगमध्ये नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोधाशोध करूनही त्यांना बॉक्स सापडला नाही. त्यानंतर त्यांनी पुण्याला परत जाऊन घरामध्येही शोध घेतला. मात्र त्यांना दागिने मिळून आले नाहीत. याबाबत त्यांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार नानासाहेब कांबळे तपास करीत आहेत.चोरट्यांनी लंपास केले दोन गंठणस्वारगेट ते गिरेवाडी या प्रवासादरम्यान अज्ञाताने दागिने चोरल्याचा संशय आल्यामुळे भारती माने यांनी याबाबतची फिर्याद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात दिली. चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सहा तोळ्याचे गंठण तसेच १ लाख ६० हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे गंठण लंपास केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस