दिवाळीच्या सुटीत सातारा शहराजवळील शाळेत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:11 IST2017-10-24T17:05:11+5:302017-10-24T17:11:18+5:30
सातारा शहराजवळील संभाजीनगरमधील एका शाळेत दिवाळीच्या सुटीदरम्यान चोरी झाली. अज्ञाताने शाळेतून एलईडी कॉम्प्युटर, मॉनिटर, प्रोजेक्टर असे ६३ हजार ५०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दिवाळीच्या सुटीत सातारा शहराजवळील शाळेत चोरी
सातारा , दि. २४ : सातारा शहराजवळील संभाजीनगरमधील एका शाळेत दिवाळीच्या सुटीदरम्यान चोरी झाली. अज्ञाताने शाळेतून एलईडी कॉम्प्युटर, मॉनिटर, प्रोजेक्टर असे ६३ हजार ५०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिससूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संभाजीगनरमध्ये भारत विद्या मंदिर शाळा आहे. या शाळेला दिवाळीची सुटी होती. सुटीच्या काळात शाळेतून कॉम्प्युटर, मॉनिटर, डिव्हाईस आदींची चोरी करण्यात आली.
याची किंमत ६३ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी अतुल दिवाकर भोरे (वय ५४, रा. सर्व्हेश्वर कॉलनी, एमआयडीसी सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.