शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पती-पत्नीमध्ये वाद, पत्नी माहेरी गेली; जवानाने रागाच्या भरात पेटवले सासूचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:48 IST

संबंधित जवानावर गुन्हा दाखल 

सातारा : पती-पत्नीच्या भांडणातून सैन्य दलात असलेल्या जवानाने रागाच्या भरात सासूचे घर पेटवून दिले. यामध्ये आर्मीची कागदपत्रे, लाखाची रोकड या आगीत जळून खाक झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबंधित जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजता आंबवडे खुर्द, ता. सातारा येथे घडली.शैलेश नारायण बाबर (रा. वेळेकामथी, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या जवानाचे नाव आहे. शैलेश बाबर हा सैन्य दलात कार्यरत आहे. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्यामुळे त्याची पत्नी आंबवडे खुर्द, ता. सातारा येथे माहेरी गेली. सुटीवर आलेला शैलेश हा दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजता आंबवडे खुर्द येथे गेला. घरात कोणी नसताना त्याने सासूच्या घराला पेट्रोल ओतून आग लावली. काही क्षणात आगीने राैद्ररूप धारण केले. घरातील संसारोपयोगी साहित्य, आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला तसेच शैलेश याची आर्मीची कागदपत्रे, अर्धा तोळ्याची बोरमाळ, बचत गटाचे एक लाख, घराच्या तुळव्या, दरवाजा आगीत जळून खाक झाला. या प्रकारानंतर पत्नी प्रियांका शैलेश बाबर (वय २७, रा. आंबवडे खुर्द, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी जवान शैलेश बाबर याच्यावर गुन्हा दाखल केला. सातारा तालुका पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस