शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नोकरदारांच्या कष्टानं गाव होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:47 IST

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याचा प्रत्यय पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतून सर्वांना येत आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एकवटलेल्या चोरे, ता. कºहाड येथील नोकरदारांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ उपसला. त्यामुळे येत्या ...

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याचा प्रत्यय पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतून सर्वांना येत आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एकवटलेल्या चोरे, ता. कºहाड येथील नोकरदारांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ उपसला. त्यामुळे येत्या पावसात हे बंधारे गाळाने नव्हे तर पाण्याने तुडुंब भरणार आहेत.मूळ चोरे गावचे; पण नोकरी निम्मिताने मुंंबई, पुणे, सातारा, कºहाड अशा अनेक गावात स्थायिक झालेल्या चोरेकरांनी ‘चोरे विकास मंच’ स्थापन केला आणि पहिल्या प्रयत्नातच त्यांनी लोकवर्गणी व श्रमदानातून सलग तीन रविवारी गाळाने भरलेल्या तीन बंधाºयातून सुमारे साडेतीनशे ट्रॉली गाळ उपसला. शेतकºयांच्या शेतीला हा गाळ दिला.चोरे व परिसरात नेहमीच शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात निर्माण होत असतो. याठिकाणी अनेक बंधारे बांधून पाणी अडवण्याचा व जिरवण्याचा प्रयत्न झाला आहे; परंतु हे बंधारे गाळाने भरून गेले असल्यामुळे डोंगरावरून पावसाचे आलेले पाणी बंधाºयात अडत नाही. ते ओढ्याने खाली येऊन नदीला मिळते. ‘चोरे विकास मंच’च्या वतीने या परिसरातील गाळाने भरलेले तीन बंधारे गाळमुक्त करण्याचा निर्धार केला. दर रविवारी एक बंधारा अशा पद्धतीने सकाळी सात वाजता कामास सुरुवात करण्यात येत होती. मंचचे सदस्य जवान शरद भोसले यांनी स्वत:चा ट्रॅक्टर माती वाहण्यासाठी दिला होता. त्याचबरोबर शेतकºयांनीही स्वत:चे सुमारे १० ट्रॅक्टर गाळ वाहतुकीसाठी दिले. विकास मंचच्या वतीने जेसीबी भाडेतत्वावर आणण्यात आला होता. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत मंचचे सदस्य संजय गोळे, दिलीप साळुंखे, प्रा. महेश लोखंडे, प्रा. जगन्नाथ देटके, राजकुमार माने, आबासाहेब लोखंडे, अंगद साळुंखे, सचिन भोसले, महेश सकटे, सतीश गोळे ही मंडळी दिवसभर कामाच्या ठिकाणी थांबू लागली. बंधाºयात उगवलेली झुडपे तोडणे, माती नेण्यासाठी नियोजन करणे, वाहने काढण्यास मदत करणे, वाहन चालकांना चहापाणी देऊन त्यांचा उत्साह वाढविणे हे काम हे करीत होते.या उपक्रमात ज्यांना सहभागी होता येत नव्हते, अशा दत्तात्रय यादव, सुभाष गोळे, प्रा. अरविंद गोळे, रवी कवळे, मकरंद कुलकर्णी, प्रवीण साळुंखे, जवान विजय साळुंखे, निखिल साळुंखे, संतोष गोळे, माऊली साळुंखे, जवान सचिन साळुंखे, अनिल लोखंडे यांनी आर्थिक पाठबळ दिले. हा उपक्रम सलग तीन रविवारी यशस्वी राबवला गेला. हे तीन बंधारे गाळमुक्त करण्यासाठी सावरघरचे सुहास पाटील, रामदास बाबर, भांबेचे संदीप पाटील, अप्पासाहेब साळुंखे यांनी गाळ स्वत:च्या वाहनाने नेऊन या उपक्रमास सहकार्य केले.चांगल्या विचारांचे युवक एकत्र आल्यावर काहीही शक्य होते, हे या निमित्ताने या मंचच्या युवकांनी दाखवून दिले आहे.तीन बंधाºयांत चाळीस लाख लिटर पाणी साचणारगाळ काढल्यामुळे आता या तीन बंधाºयांत सुमारे चाळीस लाख लिटर पाणी साठवण होईल, असा अंदाज शासकीय अधिकाºयांनी वर्तवला आहे. या बांधºयात साठणाºया पाण्यावर सुमारे तीस एकर शेतीक्षेत्र भिजणार आहे. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून, पाणी पाझराच्या माध्यमातून खालच्या भागातील विहिरीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.