साताऱ्यात अनोखी खड्डे चुकवून वाहन चालवा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 15:36 IST2021-03-22T15:34:12+5:302021-03-22T15:36:57+5:30

Road Satara- पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड-ते सदर बाझार या रस्त्याची अवस्था सुधारण्याबाबत नगरपालिका प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी यांना विनंती करूनही या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखी खड्डे मोजा व खड्डे चुकवून वाहन चालवण्याची स्पर्धा सदर बाझार येथील नागरिकांतर्फे आयोजित केली आहे.

Driving competition by avoiding unique pits in Satara, warning of Vikas Dhumal | साताऱ्यात अनोखी खड्डे चुकवून वाहन चालवा स्पर्धा

साताऱ्यात अनोखी खड्डे चुकवून वाहन चालवा स्पर्धा

ठळक मुद्दे विकास धुमाळ यांचा इशारा सदर बाझार-जिल्हा रूग्णालय-पोवई नाका रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात

सातारा : पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड-ते सदर बाझार या रस्त्याची अवस्था सुधारण्याबाबत नगरपालिका प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी यांना विनंती करूनही या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखी खड्डे मोजा व खड्डे चुकवून वाहन चालवण्याची स्पर्धा सदर बाझार येथील नागरिकांतर्फे आयोजित केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विकास धुमाळ यांनी या स्पर्धेची घोषणा केली. दरम्यान, या स्पर्धेची प्रशासनाने दखल न घेतल्यास या रस्त्यावरील खड्डयात स्पर्धेत सहभागी नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड ते सदर बाझार दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होईल तेव्हा होईल, त्यापूर्वी खड्डयांचे पँचिंग वर्क तरी करा, अशी मागणी नागरिकांची आहे. हे काम करण्यासाठी नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.

या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यावरील खड्डयांतून प्रवास करताना वाहने नादुरूस्त होत आहेत. रिक्षाचे नुकसान होत आहे. चालक या रस्त्याची अवस्था पाहून दुसऱ्या मार्गाचा वापर करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दुचाकीस्वार, महिला व नागरिकांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. या मार्गावर दररोज छोटे अपघात होत आहेत.

Web Title: Driving competition by avoiding unique pits in Satara, warning of Vikas Dhumal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.