भरधाव कार चालकाने तीन दुचाकींना उडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:14 IST2020-06-26T18:14:10+5:302020-06-26T18:14:54+5:30
भरधाव कार चालकाने एकापाठोपाठ तीन दुचाकीस्वारांना उडविल्याची खळबळजनक घटना वळसे, ता. सातारा येथे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. यामध्ये तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरधाव कार चालकाने तीन दुचाकींना उडवले
सातारा : भरधाव कार चालकाने एकापाठोपाठ तीन दुचाकीस्वारांना उडविल्याची खळबळजनक घटना वळसे, ता. सातारा येथे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. यामध्ये तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वळसे, ता. सातारा गावच्या हद्दीत महामार्गावर हा थरार घडला. नागठाणेहून कार साताऱ्याकडे येत होती. यावेळी वळसेजवळ एकापाठोपाठ तीन दुचाकीस्वारांना संबंधित कारने उडविले. यातील एक दुचाकीस्वार तर महामार्गावरून थेट सेवारस्त्यावर पडला. त्यामुळे संबंधित दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळी न थांबता तेथून पलायन केले. संबंधित कार चालकाचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली आहे तर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.