शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न साकारलं..माळावर बीज अंकुरल

By admin | Updated: April 9, 2016 00:14 IST

खंडाळा तालुका : किसन वीर खंडाळाच्या गव्हाणीत मोळी पडल्याने आनंदाला आले भरतें

खंडाळा : थोडथोडकी नव्हे तर २१ वर्षांच्या खडतर तपश्चर्येतून साकारणारा स्वप्नपूर्तीचा प्रसंग डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पावलं म्हावशीच्या माळाच्या दिशेने येत होती. कारखाना होणारच नाही, असे टीकेचे, उपहासाचे आणि प्रसंगी प्रचंड विरोधाचे घाव सोसून जणू दगडाचा देव आणि मातीची मूर्ती कशी झाली, हे पाहण्याची उत्सुकता त्या हजारो डोळ्यांत होती. आणि तो क्षण आला. गव्हाणीत उसाची मोळी पडली आणि उपस्थित हजारोंच्या मनातलं स्वप्न सत्यात साकारल्याचा, माळावर हिरवं बीज अंकुरल्याचा आनंद झाला. किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या गळित चाचणी हंगाम शुभारंभावेळी आनंद, अभिमान आणि कष्टाचं चीज झाल्याच्या भावनेतून आनंदाश्रूंनी पाणावलेले डोळे अशा संयुक्त भावनांचा कल्लोळच दाटून आल्याचे दिसून आले. चाचणी गळित हंगामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा मुदगल यांच्या हस्ते झाला. जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘संपूर्ण साखर कारखानदारीत पहिल्या टॉप टेनमध्ये किसन वीर कारखान्याचा समावेश आहे. संबंधित विभागाकडून माहिती घेऊनच मी हे सांगत आहे. किसन वीर उद्योग समूह सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यात मोलाचे योगदान देत आहे. त्या प्रयत्नातून उभारण्यात आलेला किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योग खंडाळ्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाला नवे आर्थिक वळण देणारा ठरेल. सहकारी साखर कारखानादारीतून कायापालट करून दाखवण्याची किमया ज्या कारखान्यांनी केली. त्यामध्ये किसन वीर उद्योग समूह अग्रभागी असून, या कारखान्याच्या माध्यमातून खंडाळ्याच्या आर्थिक परिवर्तनाला प्रारंभ झाला आहे.’मदन भोसले म्हणाले, ‘कारखाना उभारताना प्रचंड अडचणी होत्या; मात्र आपण जे काम करतोय, ते सर्वसामान्य जनतेसाठी करतोय ही भावना मनात होती. त्याच जोरावर हा टप्पा गाठला आहे. भागीदारी तत्त्वावर उभारण्यात आलेला सहकारी साखर कारखानदारीतला हा कारखाना देशाच्या आणि राज्याच्या सहकारातील पहिलं उदाहरण आहे. सध्या साखर कारखानदारीतील खासगीकरणाचे वारे पाहता सहकारातून उभारलेला हा कदाचित अखेरचा कारखाना ठरेल.’ संचालक धनाजी डेरे व त्यांच्या पत्नी शालन डेरे यांच्या हस्ते गव्हाणीची पूजा झाली. अध्यक्ष मदन भोसले, डॉ. नीलिमा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, प्रादेशिक सह संचालक (साखर) एस. पी. घोरपडे, सेंट्रल एक्साईज सातारा विभागाचे असिस्टंट कमिशनर बी. आर. नवले, महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. एल. गणेशकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)घरची साथ.. जिल्हाधिकाऱ्यांचा हात...किसन वीर उद्योग समूहाचे प्रमुख मदन भोसले यांनी आपल्या भाषणात सर्वांच्या सहकार्याचा उल्लेख करत असताना पत्नी नीलिमा भोसले यांच्याकडे पाहत घरातून भक्कम पाठिंबा मिळाल्यानेच आपण धाडसाने काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना क्षणभर भरूनही आलं होतं. जिल्हाधिकारी मुदगल यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी किसन वीरचा गळित हंगाम शुभारंभ झाला होता त्यावर्षी विक्रमी गाळप झालं होतं. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा हात लाभदायी असल्याचेही त्यांनी सांगून खंडाळ्यातील विविध उद्योगासाठी कुशल कर्मचारी तयार करणारी संस्था या परिसरात उभारण्यास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले.