कोयना धरणाचे दरवाजे केले बंद - : पाऊस मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:43 IST2019-08-16T20:41:44+5:302019-08-16T20:43:06+5:30
सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तसेच पश्चिम भागामध्ये मशागतीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.

कोयना धरणाचे दरवाजे केले बंद - : पाऊस मंदावला
सातारा : पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे शुक्रवारी (दि. १६) दुपारी सव्वातीन वाजता बंद करण्यात आले. शुक्रवारी संपूर्ण दिवसभरामध्ये कोयना धरण परिसरात १४, महाबळेश्वरात ३१ तर नवजामध्ये ७ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तसेच पश्चिम भागामध्ये मशागतीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. शुक्रवारी बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले. कण्हेर तसेच वीर या धरणांतील विसर्ग पूर्णत: थांबवला आहे. धोम, वीर, वांग-मराठवाडी या धरणांच्या परिसरात शुक्रवारी पाऊसच झाला नाही.
दरम्यान, कोयना धरणात ९८.९० टीएमसी, धोममध्ये १२.७७, बलकवडीमध्ये ३.७५, कण्हेरमध्ये ९.४४, उरमोडीत ९.६५, वीरमध्ये ९.७६७, तारळीमध्ये ४.९८८, वांग -मराठवाडीत १.०६३ टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे.
महाबळेश्वरात सर्वाधिक पाऊस
यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरमध्ये पडला. ६ हजार १२५ मिलिमीटर इतक्या मोठ्या पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीमध्ये १ हजार ५२९ इतकी पावसााची सरासरी इतकी असून, महाबळेश्वरात सरासरीच्या सहापट पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे
सातारा : ५.५५
जावळी : १
पाटण ५.५५
कºहाड : ०.४६
कोरेगाव : ०.५६
खटाव : ०.३६
माण : ०
फलटण : ०.२२
खंडाळा : ०.३५
वाई : ०.१४
महाबळेश्वर : ३७.३५