शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

टंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नका, जिल्हा परिषदेच्या सभेत सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:22 PM

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू झालाय. तरीही टंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नका. वस्तुस्थिती जाणून घ्या. विनाकारण टँकर बंद करू नका. वाटल्यास खेपा कमी करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच यावेळी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जात दोन कोटींपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देटंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नकासातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरू झालाय. तरीही टंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नका. वस्तुस्थिती जाणून घ्या. विनाकारण टँकर बंद करू नका. वाटल्यास खेपा कमी करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच यावेळी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जात दोन कोटींपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा झाली. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे (ग्रामपंचायत), किरण सायमोते (पाणी व स्वच्छता), कृषी समिती सभापती मनोज पवार, शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याणचे सभापती शिवाजीराव सर्वगोड आदींसह विविध विभागांचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.या सभेत दुष्काळावर चर्चा घडून आली. जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे. ही चांगली गोष्ट असलीतरी अनेक ठिकाणी म्हणावसा पाऊस झालेला नाही. अशा स्थितीत टंचाईग्रस्तांसाठी सुरू असणारे टँकर वेळेत जातात का नाहीत, ते पाहावेत. पाऊस पुरेसा पडलाय का ? लोकांना योग्य प्रमाणात पाणी मिळतेय का ? हे पाहावे.

पाऊस सुरू झाला म्हणून टँकर बंद करू नका. वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यावा. वाटल्यास टँकरच्या खेपा कमी कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींची संख्या वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर