उदयनराजे, रामराजेंचा प्रवेश पोरांचा प्रवेश मानायचा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 06:18 IST2019-09-01T06:18:01+5:302019-09-01T06:18:06+5:30

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणतात की, पोरं प्रवेश करत आहेत, मग उदयनराजे भोसले यांनी उद्या प्रवेश केला तर ते पोर आहेत काय?

Did Udayan Raje, Ram Rajan's admission be considered as Por's entry? | उदयनराजे, रामराजेंचा प्रवेश पोरांचा प्रवेश मानायचा का?

उदयनराजे, रामराजेंचा प्रवेश पोरांचा प्रवेश मानायचा का?

कोरेगाव (जि.सातारा) : राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणतात की, पोरं प्रवेश करत आहेत, मग उदयनराजे भोसले यांनी उद्या प्रवेश केला तर ते पोर आहेत काय? उदयनराजेच काय शिवेंद्रसिंहराजे, पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील अगदी रामराजे सुद्धा हे विकासासाठीच प्रवेश करणारे आहेत. हे लहान पोरं नव्हेत तर शहाणी लोकं आहेत, त्यांना पोरं म्हणायचे का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

कोरेगाव येथे शनिवारी राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील म्हणाले, त्यांना लहान-सहान कार्यकर्ते दिसत नाहीत. किती वर्षे कार्यकर्त्यांनी काम करायचे आणि यांनी घरातील सुप्रिया, पार्थ काय अन् रोहित यांनाच राजकारणात संधी द्यायची.

Web Title: Did Udayan Raje, Ram Rajan's admission be considered as Por's entry?