अजित जाधवमहाबळेश्वर : गिरिस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह सत्ता काबिज करत शहराच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक राष्ट्रवादीच्या झोळीत गेल्याने महाबळेश्वरच्या राजकीय समीकरणांत मोठा बदल घडून आला. या विजयामागे मंत्री मकरंद पाटील यांनी निवडणुकीत शेवटच्या चार दिवसांत केलेले आक्रमक, नियोजनबद्ध आणि थेट मतदारांपर्यंत पोहोचणारे फिल्डवर्क निर्णायक ठरले.निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मकरंद पाटील यांनी महाबळेश्वरमध्ये अक्षरशः तळ ठोकत प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष उपस्थिती लावली. उमेदवारांसोबत घराघरांत भेटी, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद आणि विकासकामांचा हिशेब मांडत मतदारांचा विश्वास मिळवण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली.यासोबतच नासीर मुलाणी यांची यशस्वी मनधरणी, शहरात व परिसरात काढलेली रॅली आणि जाहीर सभांमधून रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन, वेण्णा लेक परिसरातील बायपास पूल, मूलभूत सुविधा यांचा ठोस पाढा वाचण्यात आला. अनुभवी उमेदवार, संघटित पक्षयंत्रणा आणि विकासाचा मुद्दा-या तिन्हींचा एकत्रित परिणाम निकालात स्पष्ट दिसून आला.
शिंदेसेनेला अपेक्षित यश नाही; प्रचारातील मर्यादा ठळकशिंदेसेनेकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या कुमार शिंदे यांच्या सहीत केवळ ०५ नगरसेवक विजयी झाले. राजकीय वर्तुळात चर्चा अशी की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची अपेक्षेप्रमाणे थेट उपस्थिती नसणे, तसेच प्रभावी सभा व प्रचारयंत्रणा उभी न राहिल्याने शिंदेसेनेला मोठा फटका बसला.याशिवाय, कुमार शिंदे स्वतः प्रभाग ०४ मधून नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे उमेदवार, तर त्यांच्या पत्नी स्वप्नाली शिंदे प्रभाग ०८ मधून रिंगणात असल्याने प्रचार, नियोजन व भेटीगाठींवर दुहेरी ताण निर्माण झाला. परिणामी घरोघरी पोहोच, वैयक्तिक संपर्क आणि थेट संवाद कमी पडल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
डी. एम. बावळेकर आघाडीप्रचाराचा अभाव ठरला अडथळा डी. एम. बावळेकर आघाडीकडून मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा, आक्रमक प्रचार आणि प्रभावी उपस्थितीचा अभाव दिसून आला. मागील विकासकामांचा प्रभावी प्रचार न होणे आणि नगरसेवक उमेदवारांची मर्यादित संख्या याचा थेट परिणाम निकालावर झाला.
माजी नगराध्यक्षांचा पराभवविकासाचा मुद्दा केंद्रस्थानी प्रभाग ०८ मधून माजी नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांचा पराभव ही निवडणुकीतील मोठी घडामोड ठरली. मागील पाच वर्षांत ठोस व दिसणारी विकासकामे न झाल्याची नाराजी मतदारांत होती. त्याच प्रभागात स्वप्नाली शिंदे यांच्या भावजयांना २४८ मते मिळाल्याने मतविभाजन झाले आणि माजी नगराध्यक्षांचा अवघ्या ०६ मतांनी पराभव झाला.
नगराध्यक्षपदासाठी पडलेली मतेमतदान : १०,५७६उमेदवार मते
- सुनील शिंदे (राष्ट्रवादी) ४,६४७
- कुमार शिंदे (शिंदेसेना) ३,१८९
- डी. एम. बावळेकर २,५३८
विजयाचे कारणे...- मकरंद पाटील यांनी निवडणुकीच्या अखेरच्या चार दिवसांत महाबळेश्वरमध्ये ठाण मांडली.- प्रत्येक प्रभागात स्वतः हजेरी, उमेदवारांसह घराघरांत भेटी.- ‘विकासकामांचा थेट हिशेब’ मतदारांसमोर ठेवत विश्वास संपादन.- रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन, वेण्णा लेक परिसर, बायपास पूल ठोस मुद्द्यांचा पाढा.- अनुभवी उमेदवार शिस्तबद्ध पक्षयंत्रणा - आक्रमक प्रचार मतदारांचा कौल.- निकाल : नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक, राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
कुमार शिंदेंचा पराभव का झाला?• कुमार शिंदे यांच्यावर दुहेरी जबाबदारीचा ताण.स्वतः नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार.पत्नीही निवडणूक रिंगणात.• प्रचार, नियोजन व भेटीगाठींवर परिणाम.• घरोघरी पोहोच व वैयक्तिक संपर्क कमी.• अपेक्षित मोठ्या नेत्यांच्या सभा व थेट उपस्थितीचा अभाव.• प्रचारयंत्रणा प्रभावीपणे उभी राहू शकली नाही.केवळ ५ नगरसेवक विजयी, नगराध्यक्षपदावर पराभव.फिल्डवर्क विरुद्ध फॉर्मेलिटी- राष्ट्रवादीने थेट जनसंपर्क, नियोजन व विकासाचा मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचवला.- शिंदेसेनेत नेतृत्वाची उपस्थिती व प्रचारातील धार कमी पडली.- महाबळेश्वरच्या राजकारणात फिल्डवर्क जिंकले, केवळ नावं अपुरी ठरली.
Web Summary : NCP won Mahabaleshwar elections due to Makrand Patil's fieldwork. Shinde's Sena faced setbacks, while NCP emphasized development, securing a majority.
Web Summary : मकरंद पाटिल के फील्डवर्क से एनसीपी ने महाबलेश्वर चुनाव जीता। शिंदे सेना को नुकसान हुआ, एनसीपी ने विकास पर जोर दिया, बहुमत हासिल किया।