शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: धोम-बलकवडी धरणाने तळ गाठला, गोळेगाव येथील पुरातन मंदिरांचे दर्शन तब्बल चोवीस वर्षांनंतर घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:52 IST

वाई (जि. सातारा) : वाई तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या धोम-बलकवडी धरणाने अनेक वर्षांनंतर तळ गाठला. हे धरण कोरडेठाक पडल्याने धरणाच्या ...

वाई (जि. सातारा) : वाई तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या धोम-बलकवडी धरणाने अनेक वर्षांनंतर तळ गाठला. हे धरण कोरडेठाक पडल्याने धरणाच्या पोटात गाडल्या गेलेल्या गोळेगाव येथील पुरातन मंदिरांचे तब्बल चोवीस वर्षांनी दर्शन घडले आहे. श्री धुरेश्वर मंदिर व श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी खुले झाल्याने नागरिकांमध्ये हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणेदेखील पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. वाई तालुक्यातील धोम व धोम बलकवडी धरणातही यंदा अल्प पाणीसाठा होता. बलकवडी धरणाची निर्मिती १९९५ मध्ये झाली. यावेळी धरणाच्या निर्मितीत योगदान देणारे गोळेगाव, गोळेवाडी हे गाव व गावातील पुरातन मंदिरे धरणात गाडली गेली.

तब्बल चोवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धरणातील पाण्याने तळ गाठला अन् धरणाच्या पोटात गुडूप झालेला इतिहास पुन्हा दृष्टिक्षेपात पडला. धरणात श्री धुरेश्वर मंदिर व श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी खुले झाले असून, काही इतिहासप्रेमी संस्था तसेच तरुणांकडून या मंदिरांमधील गाळही काढण्यात आला आहे. ही पुरातन मंदिरे नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरली असून, हा इतिहास पाहण्यासाठी नागरिकांची पावले धरणाकडे वळू लागली आहेत.

प्राचीन मंदिराचा हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर सरकारने अशा मंदिरांचे स्थलांतर करून पुरातत्त्व विभागामार्फत त्याने संवर्धन करायला हवे. या वास्तू हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. - रोहित मुंगसे, इतिहास अभ्यासक 

वाईतील भटकंती सह्याद्रीची परिवार गेली सहा वर्षे वाई परिसरात संशोधन करत आहे. संस्थेने मागील काही वर्षेच बऱ्याच अज्ञातस्थळांचे शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. बलकवडी धरणाच्या पोटात गुडूप झालेला इतिहासही अभ्यासानंतर दृष्टिक्षेपात आणला जाईल. - सौरभ जाधव, सदस्य भटकंती सह्याद्रीची परिवार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणTempleमंदिर