धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक : हेमंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:29+5:302021-06-20T04:26:29+5:30
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनगर समाज एकीकरण कमिटीच्या शिष्टमंडळासह अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नुकतीच पुण्यात भेट ...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक : हेमंत पाटील
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनगर समाज एकीकरण कमिटीच्या शिष्टमंडळासह अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नुकतीच पुण्यात भेट घेतली. यावेळी पवार यांना धनगर आरक्षणासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असे पाटील यांनी सांगितले.
अजित पवार यांनी सांगितले की काही दिवसांतच सरकारी वकील यांच्याशी चर्चा करून आपला हा विषय मार्गी लावण्यात येईल. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी उत्सुक आहे आघाडी सरकार हे आपले सरकार आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली आहे असे पवार म्हणाले.
हेमंत पाटील म्हणाले, वर्षापासून मी धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका अंतिम टप्यात असून, या याचिकेची सुनावणी जुलै २०२१ला येण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी आपण महाराष्ट्रातील धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी आणि आरक्षण मिळून देण्यासाठी उच्च न्यायालयाचे सरकारी वकील व संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करून राज्य सरकारच्या वतीने धनगर व धनगड एकच असून, महाराष्ट्रातील धनगर समाज हा एस.टी.मध्ये मोडत आहे व धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.