शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मजुराचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 11:47 IST

ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, मंगळवारी दुपारी साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या एका मजुराचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात मजुराचा डेंग्यूने मृत्यूपालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा

सातारा : ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, मंगळवारी दुपारी साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या एका मजुराचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.रुपेश महादेव सावंत (वय ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे डेंग्यूने मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. सावंत हे मार्केट यार्डमध्ये मजुरी करत होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते तापाने आजारी होते. त्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

सोमवारी सायंकाळी थोडे बरे वाटल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतु मंगळवारी दुपारी अचानक त्यांना पुन्हा ताप आला. एवढेच नव्हे तर त्यांना धाप लागून श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. घरात्यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन सफाई कर्मचारी आजारी पडले असून, त्यांनाही डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. तसेच सदर बझारमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी दुपारी जाऊन पाहणी केली. त्यावेळी एका घरामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात अळ्या सापडल्या. संबंधितांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन यावेळी कर्मचाऱ्यांनी केले.

टॅग्स :dengueडेंग्यूSatara areaसातारा परिसर