सातारा : गुन्ह्यात जप्त केलेली कार सोडून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी महिला पोलिसावर म्हसवड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी दुपारी म्हसवड येथे करण्यात आली.नीता नारायण पळे (रा. क्रांतिसूर्यनगर, म्हसवड, ता. माण) असे गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, म्हसवड पोलिसांनी एका गुन्ह्यात तक्रारदाराची कार जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास हवालदार नीता पळे हिच्याकडे होता. गुन्ह्यात जप्त केलेली कार सोडून देण्यासाठी नीता पळे हिने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने सातारा येथे येऊन लाचलुचपत विभागात रितसर लेखी तक्रार दिली. लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता नीता पळे ही पंचासमक्ष तक्रारदाराकडे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी म्हसवड पोलिस ठाण्यात तिच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार गणेश ताटे, नीलेश राजपुरे, नवनाथ शिंदे, स्नेहल गुरव यांनी केली. पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे या पुढील तपास करीत आहेत.
Web Summary : A female police officer in Mhaswad, Satara, has been booked for demanding a ₹5,000 bribe to release a seized car. The Anti-Corruption Bureau laid a trap after receiving a complaint. Further investigation is underway.
Web Summary : सतारा के म्हसवड में जब्त कार को छोड़ने के लिए एक महिला पुलिस अधिकारी पर 5,000 रुपये की रिश्वत मांगने का मामला दर्ज किया गया है। शिकायत मिलने के बाद भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने जाल बिछाया। आगे की जांच जारी है।