Satara: अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसूती, जावळी तालुक्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: January 15, 2024 15:47 IST2024-01-15T15:46:46+5:302024-01-15T15:47:26+5:30

संशयित आरोपी कर्नाटकचा

delivery a minor girl due to torture, an incident in Jawli taluka satara | Satara: अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसूती, जावळी तालुक्यातील घटना

Satara: अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसूती, जावळी तालुक्यातील घटना

सातारा : एका पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाला असून, त्यातून मुलीची प्रसूती झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. ही धक्कादायक घटना जावळी तालुक्यात घडली असून, याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात कर्नाटकातील एका चोवीस वर्षीय तरुणावर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. ती मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही संबंधित तरुणाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. यातून संबंधित मुलगी गर्भवती राहिली. रविवार, दि. १४ रोजी पीडित मुलीची प्रसूती झाली असून, तिने एका मुलास जन्म दिला. या घटनेची माहिती मेढा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदवला. 

त्यानंतर संबंधित तरुणाविरोधात बाल लैंगिक अत्याचारानुसार गुन्हा दाखल केला. सध्या संशयित आरोपी पसार झाला आहे. मेढा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील या अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: delivery a minor girl due to torture, an incident in Jawli taluka satara