शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळातील नादुरुस्त वाहने हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 18:02 IST

Mahabaleshwar Hill Station Satara area -महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळावर अनेक महिने जागा अडवून उभ्या असलेल्या भंगार व नादुरुस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अनेक वाहनांची क्रेनच्या साहाय्याने पालिकेने उचलबांगडी केली आहे. काही वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली.

ठळक मुद्देवाहनतळातील नादुरुस्त वाहने हटवलीअनेक वाहनांची क्रेनच्या साहाय्याने उचलबांगडी

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळावर अनेक महिने जागा अडवून उभ्या असलेल्या भंगार व नादुरुस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अनेक वाहनांची क्रेनच्या साहाय्याने पालिकेने उचलबांगडी केली आहे. काही वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली.महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी दरवर्षी साधारण वीस ते पंचवीस लाख पर्यटक भेटी देतात. दरवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने अनेकवेळा वहातुकीची कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी वाहनतळाची असलेली आवश्यकता लक्षात घेत पालिकेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारले आहे.

हे वाहनतळही मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना अपुरे पडत असते. तरीही या वाहनतळाचा काही नागरिकांनी गैरफायदा उठवण्याच्या उद्देशाने आपली भंगार व नादुरुस्त टाकाऊ वाहने या वाहनतळावर आणून उभी केली आहेत. ही वाहने अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. या वाहनांमुळे पर्यटकांची प्रचंड गैरसोय होत असून पर्यटकांना आपली वाहने अन्यत्र उभी करावी लागत आहेत.वाहनतळाबरोबरच शहरातील काही रस्त्यांवर अशाच प्रक्रारे वाहने उभी असून मोठा अडथळा होत आहे. याबाबत काही नागरिकांनी मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दाखल घेऊन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी संबंधित वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला पालिका कर्मचाऱ्यांना सूचना देऊन एक कृती आराखडा तयार केला.

या आराखड्यानुसार मुख्याधिकारी पल्लवी पाटील पालिका कर्मचारी व क्रेनसह पालिकेच्या वाहनतळात पोचल्या. त्यांनी तात्काळ नादुरुस्त व भंगार वाहनावर क्रेनच्या साहाय्याने कारवाई सुरु केली. काहींवर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली. यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे शरद मस्के आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान