‘अर्पण’चे सीडबॉल पर्यावरणास अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:25 AM2021-06-22T04:25:34+5:302021-06-22T04:25:34+5:30

वाई : कोरोनाच्या महासंकटात ऑक्सिजनचे महत्त्व व गरज संपूर्ण जगाला कळली. आपल्याला मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे महत्त्वही त्यामुळे कळले ...

Dedication of ‘Arpan’ to Seedball Environment | ‘अर्पण’चे सीडबॉल पर्यावरणास अर्पण

‘अर्पण’चे सीडबॉल पर्यावरणास अर्पण

Next

वाई : कोरोनाच्या महासंकटात ऑक्सिजनचे महत्त्व व गरज संपूर्ण जगाला कळली. आपल्याला मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे महत्त्वही त्यामुळे कळले आहे. यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हाच एकमेव उपाय आहे. या उद्देशाने वाई येथील अर्पण ग्रुपने एक पाऊल पुढे टाकले असून, ग्रुपच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सीडबॉलपैकी पाचशे सीडबॉल सोनजाई डोंगरावर टाकण्यात आले.

कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन वाईमधील अर्पण ग्रुपने पर्यावरण संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आतापर्यंत अर्पण ग्रुपतर्फे तीन हजार सीडबॉल्स तयार करण्यात आले आहेत. सीडलॉल्स बनविणे हे अतिशय सोपे आहे. यामध्ये माती व शेणखत यांचे मिश्रण करून त्यांचा गोळा केला जातो व त्यामध्ये कोणत्याही झाडाची बी टाकली जाते. हे गोळे वाळवून नंतर हव्या त्याठिकाणी पावसाळा ऋतूत टाकले की त्यापासून नवनवीन झाडांची निर्मिती होते.

अर्पण ग्रुपच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आता वाईमधील पर्यावरणप्रेमी नागरिकांची मोलाची साथ लाभत आहे. अर्पण ग्रुप व सोनजाई ट्रेकिंग ग्रुपच्यावतीने वाईमधील सोनजाई डोंगरावर, सोनजाई मंदिर परिसरात नुकतेच हे सीडबॉल्स टाकण्यात आले आहेत. यावेळी सोनजाई देवस्थानचे मंगलगिरी महाराज, रामदास राऊत, धनंजय घोडके, चंद्रकांत गोळे यांच्यासह अर्पण ग्रुपचे सदस्य पंकज खागे, चेतन अनपट, प्रतीक सरकाळे, प्रद्युम्न कानिटकर, प्रतीक गायकवाड, निखिल बगाडे, मितेश महांगडे, मयूर महांगडे, सोहम देशमाने, साहील देशमाने उपस्थित होते.

(कोट)

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून आपल्याला अविरत ऑक्सिजन देणारी झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आम्ही लॉकडाऊनचा सदुपयोग करून सीडबॉल तयार केले असून, वाई परिसरातील डोंगरावर हे सीडबॉल आम्ही टाकणार आहोत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोनजाईच्या डोंगरावर सीडबॉल टाकण्यात आले आहेत.

- प्रतीक सरकाळे, सदस्य, अर्पण ग्रुप

फोटो : २१ वाई सीडबॉल

वाई येथील अर्पण ग्रुपच्यावतीने तयार करण्यात आलेले सीडबॉल सोनजाई डोंगरात टाकण्यात आले. (छाया : पांडुरंग भिलारे)

लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी

Web Title: Dedication of ‘Arpan’ to Seedball Environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.