Satara: ‘युनेस्को’च्या वारसास्थळांत 'डेक्कन ट्रॅप्स'चा समावेश, ज्वालामुखी प्रांतांपैकी एक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:42 IST2025-09-16T18:41:36+5:302025-09-16T18:42:54+5:30
युनेस्को डेक्कन ट्रॅप्स मध्ये भारतातील सात नव्या ठिकाणांचा समावेश..

Satara: ‘युनेस्को’च्या वारसास्थळांत 'डेक्कन ट्रॅप्स'चा समावेश, ज्वालामुखी प्रांतांपैकी एक
पाचगणी : ‘युनेस्को’मधील जागतिक वारसास्थळांत महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांवरील डेक्कन ट्रॅप्सचा समावेश झाल्याने ही पर्यटनस्थळे जागतिक पटलावर आली आहेत. यासहित सात नव्या ठिकाणांचा समावेश ‘युनेस्को’कडून भारताच्या जागतिक वारसाच्या तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. युनेस्कोमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाने म्हटले आहे की, या ठिकाणांच्या समावेशाने भारताच्या ‘समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाची वचनबद्धता प्रतिबिंबित झाली आहे.’
दि. १२ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये युनेस्को (इंडिया)ने म्हटले आहे की, ‘युनेस्को’मधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारतातील सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
युनेस्कोमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, नैसर्गिक श्रेणीतील या सात संपत्तीमध्ये महाराष्ट्रातील पाचगणी आणि महाबळेश्वर येथील डेक्कन ट्रॅप्स, सेंट मेरी बेटांचा भूगर्भीय वारसा (उडपी, कर्नाटक), मेघालयातील गुहा (पूर्व खासी टेकड्या, मेघालय), नागा हिल ओफिओलाइट (किफिर, नागालँड) यांचा समावेश आहे.
ज्वालामुखी प्रांतांपैकी एक
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात असलेले पाचगणी आणि महाबळेश्वर येथील दख्खन पर्वतीय रांग जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि विस्तृत बेसाल्टिक ज्वालामुखी प्रांतांपैकी एक आहेत.
पाचगणी हे टेबललँड सपाट-आडव्या कॅप्रॉकपासून बनलेले आहेत आणि सर्व बाजूंनी खरखरीत आहेत. फेरिक्रेट ड्युरिक्रस्ट (किंवा लॅटराइट्स) कॅप्रॉक म्हणून काम करतात.
टेबललँड हे सपाट उंच माथ्यावर प्रकार आहे, जे प्रामुख्याने बेसाॅल्ट खडकांमुळे तयार होतात आणि महाराष्ट्रात पाचगणीसारख्या ठिकाणी आढळतात. बेसाल्ट हा ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हापासून तयार होणारा एक प्रकारचा खडक आहे, जो थंड होऊन पठार आणि टेकड्या तयार करतो.