Satara: प्रेमीयुगुलाचे मृतदेह सापडले, तलावात उडी मारुन संपवले होते जीवन

By दत्ता यादव | Updated: October 2, 2023 14:11 IST2023-10-02T14:10:50+5:302023-10-02T14:11:39+5:30

सातारा : कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील तलावात आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे मृतदेह शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला शोधण्यात यश आले. तरुणीचा मृतदेह रविवारी रात्री तर तरुणाचा आज, सोमवारी सकाळी मृतदेह सापडला. अक्षय ज्योतीराम ...

Dead bodies of couple found, had ended their lives by jumping into lake in Satara | Satara: प्रेमीयुगुलाचे मृतदेह सापडले, तलावात उडी मारुन संपवले होते जीवन

Satara: प्रेमीयुगुलाचे मृतदेह सापडले, तलावात उडी मारुन संपवले होते जीवन

सातारा : कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील तलावात आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे मृतदेह शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला शोधण्यात यश आले. तरुणीचा मृतदेह रविवारी रात्री तर तरुणाचा आज, सोमवारी सकाळी मृतदेह सापडला. अक्षय ज्योतीराम पवार (वय २६), गाैरी चव्हाण (२३, दोघेही रा. दिव्यनगरी शाहूपुरी सातारा) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरी दिव्यनगरीतून कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एक तलाव आहे. या तलावात अक्षय आणि गाैरी या दोघांनी रविवारी दुपारी चार वाजता उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे जवानही तेथे पोहोचले. रात्री सातला शोधमोहीम हाती घेण्यात आली. 

रात्री दहा वाजता गाैरी हिचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागला. प्रचंड पाऊस सुरू झाल्याने रात्री अकरा वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी काही वेळातच अक्षयचाही मृतदेह सापडला. दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या दोघांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. सातारा तालुका पोलिस दोघांच्या घरातल्यांकडे चाैकशी करत आहेत.

Web Title: Dead bodies of couple found, had ended their lives by jumping into lake in Satara