शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोच्या मुद्दलातच होतोय घाटा!

By admin | Updated: August 19, 2015 21:34 IST

खटाव परिसर : दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

खटाव : खटावसह परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोचे लागवड केली आहे; परंतु सुरुवातीच्या तोड्याला चांगला दर मिळाल्यानंतर टोमॅटोचे मार्केटमधील दर अचानक कमी आल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. टोमॅटोचे एक रोप एक रुपये या दराने विकत घेऊन शेतकरी या टोमॅटोच्या बागा तयार केल्या आहेत. एकरी दहा हजार रोपे सरासरी लावली जातात. या रोपांना लागणारे खत तसेच वारंवार किडीपासून संरक्षणाकरिता मारावी लागणारी औषधे आदीचा खर्च वीस हजारांपर्यंत येतो. तसेच तर रोपांची वाढ झाल्यानंतर दहा हजार काट्या, सुतळ्या, तारा आदीचा खर्च वेगळाच येतो. मजुरीचा खर्च पाहता या खर्चाचा ताळमेळ शेतकऱ्याला बसेनासा झाला आहे. ज्यावेळी मार्केटमध्ये टोमॅटोला भाव चांगला मिळेल; त्याच वेळी शेतकरी या सर्व गोष्टींचा खर्च वजा जाता हे पीक फायद्याचे ठरते; परंतु सध्या मार्केटमध्ये टोमॅटोचा दर इतका नीचांकी झाला आहे की, शेतकऱ्यांनी पाठवलेल्या कॅरेटच्या वाहतुकीचा खर्च तर सोडाच, ते टोमॅटो तोडण्यासाठी शंभर रुपये हजेरीने लावलेल्या मजुरीचाही खर्च अंगावर येत आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोचे केलेले प्लॉट तोडीविना तसेच सोडून दिले आहेत. तर बऱ्या शेतातून टोमॅटोचा ढीग पडलेला दिसतो. मी वीस गुठ्यांत टोमॅटोची लागवड केली आहे. सरासरी चार-पाच वेळा तोडा केला जातो. पहिल्या प्रथम काढलेल्या मालाला मार्केटमध्ये दर बऱ्यापैकी मिळाला; परंतु दुसऱ्या तोडीपासून दर अचानक उतरल्यामुळे आम्ही अडचणीत आलो. माझे टोमॅटोचे आठ कॅरेट मार्केटमध्ये पाठवले, त्याचे अवघे ८0 रुपये पट्टी आली. त्यामुळे मलाच कळले नाही की, माझ्या मालाला काय दर लागला ते. मी ते टोमॅटो काढण्यासाठी लावलेल्या मजुरांची मजुरीही त्यातून भागवता आली नाही. त्यामुळे टोमॅटोची बाग जनावरांसाठी सोडून दिली. माझ्यासारख्या बऱ्याच शेतकऱ्यांनी असाच निर्णय घेतला आहे.- राजेंद्र जगदाळे, शेतकरी