शेतकऱ्यांमध्ये वाढतेय सीताफळाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:04+5:302021-06-22T04:26:04+5:30
बदलती वातावरणीय परिस्थिती, पावसाची अनिश्चितता, रासायनिक खते व निविष्ठांच्या वाढत्या किमती यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा कल फळपीक उत्पादनाकडे आहे. ...

शेतकऱ्यांमध्ये वाढतेय सीताफळाची गोडी
बदलती वातावरणीय परिस्थिती, पावसाची अनिश्चितता, रासायनिक खते व निविष्ठांच्या वाढत्या किमती यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा कल फळपीक उत्पादनाकडे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, आंबा, अंजिर, द्राक्ष पिकांचा समावेश आहे. परंतु अलीकडील काही वर्षांत डाळिंब पिकावरील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव तसेच इतर फळपीक उत्पादनातील अनिश्चितता यांचा विचार करता सीताफळ कमी पाण्यावर व रोगाला लवकर बळी न पडणारे फळपीक आहे. अलीकडे त्याची मागणी वाढू लागल्याने शेतकरी सीताफळ लागवडीवर भर देत आहेत. त्यासाठी बाळानगरी, सुपर गोल्डन या जातीच्या रोपांना शेतकरी पसंती देत आहेत. महाराष्ट्र शासनाकडून फळबाग लागवड योजनेतंर्गत सीताफळ लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा हातभार मिळत आहे.
कोट
कमी पाण्यावर व किडीला प्रतिबंध करणारे सीताफळ पीक असून फळासह त्यापासून तयार होणाऱ्या रबडी, आईस्क्रीम यांसाठी सीताफळाला चांगली मागणी असल्याने अलीकडे शेतकऱ्यांकडून रोपांची मागणी वाढत आहे,
महेश जगदाळे
रोपविक्रेते