शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Kaas plateau: धुक्यात हरवतंय कास, अंगावर जलधारा झेलत पर्यटक घेतायत पर्यटनाचा आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 16:15 IST

पावसात भिजण्याचा आनंद तसेच धबधब्यासमवेत, निसर्गासमवेत फोटोसेशन करण्याकडे पर्यटक आकर्षित

पेट्री (सातारा) : शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावर असलेले कास हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. कास परिसरात मान्सूनची दमदार सुरुवात झाली असून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून पर्यटकांची कास तलावावर गर्दी होऊ लागली आहे. परिसरात आलेल्या बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास तलाव बहरू लागला आहे. बहुसंख्य पर्यटकांनी रविवारी हजेरी लावत शेकडो दुचाकी, चारचाकी दिसून येत होत्या.निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पर्यटनस्थळी पर्यटकांची सतत वर्दळ असते. सध्या पावसात भिजण्याचा आनंद तसेच धबधब्यासमवेत, निसर्गासमवेत फोटोसेशन करण्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. कासला मंगळवार, शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी पर्यटक कुटुंबासमवेत फिरण्यास येत आहेत. कास तलावावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कास तलावातील पाणीपातळी मोठ्याप्रमाणावर वाढल्याने तलावाच्या काठावर पर्यटक मौजमजा करत फोटोसेशन करताना दिसत होते. तसेच चारचाकी गाडीतील डेकवर नृत्याचा आनंद घेत आहेत. ठिकठिकाणी तरुणाई संगीताच्या तालावर ठेका घेत थिरकताना दिसत आहेत.धुक्यात हरवतंय कासपरिसरात मागील आठवड्यापासून दमदार पाऊस सुरू आहे. परिसरातील धबधबे मोठ्या प्रमाणावर कोसळतानाचे चित्र आहे. तसेच कास पठारासह कास तलाव परिसरात दिवसभर धुक्याची दुलई पाहावयास मिळत असल्याने पर्यटक जलधारा झेलत गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत.

पावसाळ्यात कास तलाव परिसरात पर्यटनासाठी आमची नेहमी सफर असते. येथील निसर्ग आम्हाला नेहमीच भावतो. परिसरातील आल्हाददायक वातावरण मन भारावून टाकतो. - प्रतीक फडतरे, पर्यटक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनKas Patharकास पठार