शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

सडावाघापूरच्या उलट्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, स्थानिकांना उपलब्ध झाल्या व्यवसायाच्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:57 IST

सडावाघापूर पठारावरून कोसळणारा (रिव्हर्स वॉटर) उलटा धबधबा अल्पावधीत प्रसिध्दीच्या झोतात

हणमंत यादवचाफळ : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अल्पावधीत प्रसिध्दीच्या झोतात आलेला सडावाघापूर पठारावरून कोसळणारा (रिव्हर्स वॉटर) उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे स्थानिक लोकांना रोजगार - व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची पाऊले वळतात ते नैसर्गिक वातावरणात असणाऱ्या डोंगर, झाडी, उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याकडे. अल्पावधीत प्रसिद्ध झालेला सडावाघापूर पठारावरील उलटा धबधबा हजारो पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पावसात भिजण्याचा आनंद, धबधब्याचे तुषार अंगावर झेलण्याचा रोमांचक क्षण अनुभवण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक पठारावर हजेरी लावत आहेत. पर्यटकांची वाढत्या गर्दीमुळे येथील स्थानिक रहिवाशांना रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे याठिकाणी अनेक कुटुंबियांनी छोटे गाळे टाकले आहेत. याठिकाणी पर्यटक खाण्याचाही आनंद घेत आहेत.पाटण तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. डोंगर रांगा, सडावाघापूरचा धबधबा, वनकुसवडेचे विस्तीर्ण पठार, कोयना धरणासह अनेक पर्यटन स्थळे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. याठिकाणी  पर्यटकांना शासनाने प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.कायमस्वरूपी व्यवसाय मिळावापर्यटकांकडून चहाला प्रचंड मागणी आहे. यामुळे या व्यवसायातून कुटुंबांचा उदरनिर्वाह चांगला होत असून आर्थिक फायदा चांगला होत आहे. मात्र हंगामी व्यवसायाबरोबर कायमस्वरूपी पर्यटन विकसित होणे गरजेचे आहे.  - दगडू कोंडीबा बोडके, चहा विक्रेता

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटन