शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बोथट समाजमनाचा हुंकार! 'ही' मनोविकृती दारापर्यंत पोहोचू शकते अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 12:06 IST

Satara News : छोट्या छोट्या गोष्टींतही समाजमाध्यमांसह प्रशासनाला धारेवर धरून आवाज उठविणं ही सातारकरांची संस्कृती. पण परवाच्या दुर्दैवी घटनेत अत्याचाराविरोधात जाहीरपणे निषेध नोंदविण्याची तसदी कोणी घेतली नाही.

प्रगती जाधव-पाटील

सातारा - क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून मानाचे पान ठरणारा सातारा जिल्हा चिमुकलीवर झालेल्या अन्यायाबाबत मात्र शांत होता. चार वर्षांच्या बालिकेला भल्या पहाटे उचलून नेऊन नराधमाने त्याची 'भूक' शमवल्यानंतर तिच्या शरीराचे लचके तोडले... निपचीत अवस्थेत फेकुन पळून गेला. मन अस्वस्थ करणाऱ्या या घटनेवर व्यक्त होणारा सातारकर रस्त्यावर उतरला नाही हे बोथट संवेदनांचं लक्षण होतं. या पद्धतीने समाज निपचित राहिल्यास ही मनोविकृती तुमच्या दारापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, असा इशारा समाजधुरीनांनी यानिमित्ताने 'लोकमत'कडे व्यक्त होताना दिला आहे.

 ही चिमुकली फिरस्ता समाजातील होती हेही त्याचे कारण असल्याचा धक्कादायक खुलासाही काहींनी केला. सोमवारी पहाटे चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याविषयी वृत्तपत्रांसह समाज माध्यमांवरही सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. पण दिल्लीत आणि मुंबईत घडलेल्या घटनेचा साताऱ्यात मोर्चा काढून तीव्र निषेध करणाऱ्यांना तिच्या विषयी आपुलकी वाटली नाही. रंगोत्सवात व्यस्त असलेल्या राजकीय गटांच्या महिला पदाधिकारी असोत की निवडणुकीची तयारी करणारे इच्छुक असोत; ती पोर किंवा तिचे कुटुंबीय ‘मतदार’ नाहीत म्हणून त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष समाजावर गंभीर परिणाम करणारे ठरणार आहे. कारण न करो अशी वेळ पुन्हा इतर कोणावर न येवो!

... तर मोर्चा निघाला असता?

सातारा शहराला हादरवून सोडणाऱ्या घटनेने समाजमन ढवळून निघाले. छोट्या छोट्या गोष्टींतही समाजमाध्यमांसह प्रशासनाला धारेवर धरून आवाज उठविणं ही सातारकरांची संस्कृती. पण परवाच्या दुर्दैवी घटनेत अत्याचाराविरोधात जाहीरपणे निषेध नोंदविण्याची तसदी कोणी घेतली नाही. कि कोणी विशिष्ठ समाजाव्यतिरिक्त कोणी रस्त्यावर आले नाही. हेच ती मुलगी अन्य  समाज घटकातील असती तर आत्तापर्यंत आंदोलने आणि धरणे देऊन समाजाच्या ठेकेदारांनी यंत्रणा हादरवली असती. पण अपवाद वगळता त्या बालिकेसाठी साधं निवेदन देण्याचीही सवड कोणाकडे नव्हती.

त्या ‘तसल्याच’ म्हणून चालत नाही

रस्त्यावर राहणाऱ्या या समाजाविषयी अनेकांच्या तीव्र टोकाच्या भावना आहेत. यांना व्यसनं करायला पैसा मिळतो, यांच्या बायकाही पिऊन लोड असतात यांसह अनेक शेरेबाजी सर्रास ऐकायला मिळते. या सगळ्याच्या मुळाशी या समाजाचे शिक्षण, रिती आणि सार्वजनिक आयुष्यात त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक कारणीभूत असल्याचा विचार सुशिक्षितांच्या डोक्यातही येत नाही. त्या बायका ‘तसल्याच’ म्हणून त्यांना हिणवणं गैर आहे. वेश्या व्यवसाय करणाºया महिलांनाही ग्राहक नाकारण्याचा अधिकार आहे. आणि पिडीता कोणीही असो अन्याय हा अन्याय असतो, याकडे दुर्लक्ष करण्याची भावना दुर्दैवाने दृढ झालेली दिसते.

ही कसली शारिरीक भुक आणि विकृती? याला केवळ कुटुंबसंस्था आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्थाच जबाबदार आहे. पुरुषांवर कसलाच बंध नाही. त्याने रात्री अपरात्री असे देह शोधत फिरलं तरी चालतं! भीक मागणाऱ्या पोरीनं कुठं जायचं. सातच्या आत घरात? तिचं घरच उघड्यावर आहे. मुलीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलायचं तर ती कुठं वरच्या जातीतली किंवा पैसेवाली होती, तेव्हा लोक पेटुन उठतील? आता तर मेणबत्त्या जाळायलाही वेळ मिळायचा नाही लोकांना.

- प्रा. समता जीवन, सातारा

अन्याय आणि अत्याचार कोणावर होतोय हे बघून आवाज उठविण्याची हल्ली फॅशन आली आहे. रस्त्यावरच्या चिमुकल्या मुलीवर हात घालण्याचा प्रकार सातारकरांनी इतक्या शांतपणे स्विकारला तर भविष्यात ही मनोविकृती तुमच्या दारापर्यंत पोहोचायलाही वेळ लागणार नाही. सामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठविणारे मुठभर राहिलेत. पण नेत्याच्या केसाला धक्का लागला की त्याचा झालेला ‘इव्हेंट’ सातारकरांनी अनेकदा अनुभवला आहे, दुर्दैव दुसरं काय!

- अ‍ॅड. वर्षा देशपांडे, सातारा

साताऱ्यात चिमुकलीवर गुदरलेल्या प्रसंगाने नक्कीच हादरवून सोडले. पण यावर व्यक्त न होणे हे समाजमन बोथट झाल्याचे लक्षण आहे. अन्याय सहन करून घेण्याची ही सवय अशीच राहिली तर भविष्यात ही विकृती आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचेल. पोलीस अधिकाऱ्यांनी या नराधमाला पकडले असले तरीही सातारकर म्हणून या विरोधात एकत्र घेऊन आवाज उठवण्याची जबाबदारी कोणीच पार पाडली नाही ही मूक संमती भविष्यात अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करू शकते. 

- कन्हैयालाल राजपुरोहित, सातारा 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी