शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पत्रकाराला धमकी देणाऱ्या उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 19:00 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना खासदार उदयनराजेंच्या संदर्भात प्रश्न विचारल्याने दिली होती धमकी

सातारा : सातारा शहरातील पत्रकाराला तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देण्यात आल्याप्रकरणी प्रीतम कळसकरवर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा संबंधित कार्यकर्ता आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी पत्रकार सुजीत आंबेकर (रा. रविवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार प्रीतम कळसकरवर (पूर्ण नाव व पत्ता नाही) गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सवा सातच्या सुमारास साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर धमकीचा प्रकार घडला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना खासदार उदयनराजेंच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावरुन प्रीतम कळसकरने पत्रकार आंबेकर यांना तुला जीवंत सोडणार नाही. तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर पत्रकार सुजीत आंबेकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रीतम कळसकरविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिस अधिकारी अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस