विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 15:06 IST2020-08-07T15:03:55+5:302020-08-07T15:06:32+5:30
वर्ये, ता. सातारा विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
सातारा : वर्ये, ता. सातारा विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विवाहितेचा भाऊ राजकुमार कलमदाणे (रा. शरदनगर, चिखली (पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, बहीण मंजूषा हिचा नोव्हेंबर २०१७ मध्ये मंजुलकुमार माणिक जाधव (रा. वर्ये, ता. सातारा) याच्याशी विवाह झाला होता.
लग्नानंतर सासरी आलेल्या मंजूषाचा जाचहाट सुरू झाला. पती मंजुलकुमार तसेच अनिता माणिक जाधव आणि मृदूला माणिक जाधव यांनी मंजूषाला तुला घरकाम येत नाही,
सकाळी लवकर उठत नाही तसेच मुलाचे पुण्यातील दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. वे
उपाशी ठेवून व मारहाण करून तिला जगणे असह्य करत आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. या तक्रारीनुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.