वाईतील सावकारावर अत्याचारप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST2021-07-19T04:25:02+5:302021-07-19T04:25:02+5:30

वाई : वाई तालुक्यातील एका सावकाराविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची ...

Crime against a moneylender in Wai | वाईतील सावकारावर अत्याचारप्रकरणी गुन्हा

वाईतील सावकारावर अत्याचारप्रकरणी गुन्हा

वाई : वाई तालुक्यातील एका सावकाराविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात संबंधित सावकार अनेक वर्षांपासून विनापरवाना सावकारी करत आहे. पैशांचे आमिष दाखवून त्याने आजवर अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने नात्यातीलच एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. आपल्या इभ्रतीखातर महिलेने झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. यानंतर पुन्हा एकदा संबंधित सावकाराने महिलेच्या घरात घुसून गैरवर्तन केले. अखेर संबंधित महिलेने झालेला सर्व प्रकार पतीला सांगितला व स्वत: विषारी औषध प्राशन केले.

दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना एका खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली. यानंतर पोलीस हवालदार बी. एस. धायगुडे, एस. जी. धुळे यांनी संशयित सावकाराला तातडीने अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुमडे करत आहेत.

Web Title: Crime against a moneylender in Wai