शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह २० कार्यकर्त्यांवर गुन्हे, बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:09 IST

पोलिसांची परवानगी न घेता बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवून भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देभाजपच्या जिल्हाध्यक्षांसह २० कार्यकर्त्यांवर गुन्हे, बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका राहुल गांधी यांच्या विरोधात केले होते आंदोलन

सातारा : पोलिसांची परवानगी न घेता बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवून भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील मोती चौकात दि. १५ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन केले होते.

या आंदोलनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. हे आंदोलन सुरू असताना शाहूपुरी पोलीस तेथे पोहोचले. हे आंदोलन बेकायदा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर जमाव जमवून उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या नावावे बोंबाबोंब आंदोलन सुरू केले. मै भी सावरकर, राहुल गांधींचा धिक्कार असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या.पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन व बेकायदा जमाव जमाव जमविल्याप्रकरणी सहायक फौजदार नारायण मोहिते यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, विकास गोसावी, अ‍ॅड. प्रशांत खामकर, किशोर गालफाडे, धीरज घाडगे, सुर्वणा पाटील, प्रवीण शहाणे, नगरसेविका दीपिका झाड, प्रवीण शहाणे, विठ्ठल बलशेटवार, रवींद्र पवार, गणेश मेळावणे, जितेंद्र नलवडे, सुनिल काळेकर, अमोल कांबळे, सागर भिसे, निलेश कदम यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर १४३ (बेकायदा जमाव जमविणे), १८८ (पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे) या कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस