शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

यादी तयार; पण इच्छुकहटेनात !

By admin | Updated: April 18, 2015 00:04 IST

जिल्हा बँकेत खलबते : रामराजे-लक्ष्मणराव पाटील यांच्यात तीन तास गुफ्तगू

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची प्रातिनिधिक यादी तयार झाली असून, येत्या २२ एप्रिलला पक्षाचे नेते अजित पवार यांच्यापुढे ही यादी मांडली जाणार असल्याची खबर सूत्रांनी दिली. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी (दि. १७ ) जिल्हा बँकेच्या प्रशासकीय इमारतीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्याशी त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुफ्तगू केली. अध्यक्षांच्या दालनातील ‘अँटीचेंबर’ मध्ये ही गुफ्तगू झाली. या चर्चेवेळी आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, संचालक अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे या निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांची उपस्थिती होती. दुपारी तीन वाजता ही मंडळी बँकेत दाखल झाली होती. उशिरापर्यंत एकमेकांशी चर्चा करत होती. जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रामराजेंना छेडले असता त्यांनी बँक निवडणुकीच्या चर्चेसाठी बसलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय अपेक्षित आहे. तसेच पॅनेलचे निर्णय जिल्हा बँकेत बसून घ्यायचे नसतात, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. सोमेश्वर कारखान्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो. तात्यांनाही बऱ्याच दिवसांत भेटलो नव्हतो. मात्र, बॅँक निवडणुकीत आमच्या पक्षाला कसलीच चिंता नाही. - रामराजे नाईक-निंबाळकर‘अर्ज माघारी’चा तणावजिल्हा बँकेच्या प्रशासकीय इमारतीतील या चर्चेदरम्यान मोजक्याच मंडळींना प्रवेश दिला जात होता. सुमारे अडीच ते तीन तास रामराजे बँकेत ठाण मांडून होते. उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतूनच मोठी चढाओढ असल्याने कोणाला अर्ज माघारी घ्यायला लावायचे, याचा तणाव रामराजे व लक्ष्मणराव पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.सातव्या दिवशीही अर्ज मागे नाहीअर्ज मागे घेण्याच्या सातव्या दिवशी एकही अर्ज मागे घेतला गेला नाही. त्यामुळे या निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे. सत्ताधारी गटाच्या पॅनेलमध्ये संधी मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावण्याचे काम मात्र सुरू ठेवले आहे.