शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भोळी येथे अपघातात चुलता-पुतण्याचा मृत्यू, घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:25 IST

ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी येथील एसटी थांब्याजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत भोळी येथील चुलता-पुतण्याचा मृत्यू झाला. अमोल रघुनाथ चव्हाण (वय ४०) व धनंजय बबनराव चव्हाण (५६, दोघे, रा. भोळी, ता. खंडाळा), अशी मृत चुलता-पुतण्याची नावे आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झाला.भोळी येथील अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण हे दोघे शिरवळ येथे नातेवाइकांच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी शनिवारी दुचाकी (एमएच ११ सीएक्स ११६५)ने आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे दोघे शिरवळहून भोळीकडे परत येत असताना सायंकाळी चारच्या दरम्यान भोळी गावच्या हद्दीत असणाऱ्या एसटी बस थांब्याजवळ पाठीमागून भरधाव कंटेनर (केए ५१ एएच ६५८२)ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. कंटेनरचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिरवळ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य तत्काळ दाखल झाले. त्यांनी दोघाही जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे अमोल चव्हाण यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी धनंजय चव्हाण यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.दोघांच्याही मृतदेहाचे विच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रोहन चव्हाण याने शिरवळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक गौरव विजय ढोरे (वय २२, रा. गडकुमली, ता. साकोली, जि. भंडारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के अधिक तपास करीत आहेत.रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल कराभोळी येथे एसटी बसस्थानक याठिकाणी कंटेनरच्या अपघातामध्ये एकाच घरातील चुलता-पुतण्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामध्ये लोणंद-शिरवळ रस्त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेपर्यंत भोळी ग्रामस्थ सोमवार, दि. २ जून रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा भोळी ग्रामस्थांनी शिरवळच्या पोलिस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू