नगरसेवक अमोल मोहिते यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 17:45 IST2017-12-22T17:45:15+5:302017-12-22T17:45:58+5:30
सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक अमोल मोहिते यांना उच्च न्यायालयाने आज शुक्रवार तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.

नगरसेवक अमोल मोहिते यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर
सातारा - सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक अमोल मोहिते यांना उच्च न्यायालयाने आज शुक्रवार तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. मोहिते यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायायलयात गुरुवारी, दि. २१ अॅड. कुलदीप पाटील आणि अॅड. संग्राम मुंढेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
त्याची शुक्रवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या पुढे सुनावणी झाली. त्यामध्ये मोहितेंना ११ जानेवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे, अशी माहिती नगरसेवक अमोल मोहिते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.