शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

नगरसेवक बाळू खंदारेंवर गुन्हा,शासकीय कामात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:31 AM

सभेच्या विषय पत्रिकेत विषय का घेतले नाहीत, अशी विचारणा करत उप मुख्याधिकारी संचित धुमाळ (वय ३२, रा. केसरकर पेठ, सातारा, मूळ रा. जोगवडी, ता. भोर, जि. पुणे) यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळला आणल्याप्रकरणी नगरसेवक विनोद उर्फ बाळासाहेब खंदारेंवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देनगरसेवक बाळू खंदारेंवर गुन्हा,शासकीय कामात अडथळा उप मुख्याधिकाऱ्यांची तक्रार

सातारा : सभेच्या विषय पत्रिकेत विषय का घेतले नाहीत, अशी विचारणा करत उप मुख्याधिकारी संचित धुमाळ (वय ३२, रा. केसरकर पेठ, सातारा, मूळ रा. जोगवडी, ता. भोर, जि. पुणे) यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळला आणल्याप्रकरणी नगरसेवक विनोद उर्फ बाळासाहेब खंदारेंवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नगरसेवक बाळू खंदारेंने दि. १३ रोजी हातात पाण्याची बादली घेऊन उप मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये प्रवेश केला. टेबलावर बादली ठेवून मी तुमच्या केबीनमध्ये प्रातविधी करणार, असे म्हणत पँट उतरवली.

अर्वाच्य भाषेत शिवीगाळही सुरू केली. मी सुचवलेले विषय सभेच्या विषय पत्रिकेत का घेतले नाहीत, असे ओरडून खंदारेंने दालनामध्ये गोंधळ घातला. टेबलवरून खंदारेंना खाली उतरविण्यास सांगितले असता धुमाळ यांचा हात जोराने झटकून धक्काबुक्की केली.

शिपाई देवानंद दळवी यांनीही खंदारेंना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही दमदाटी करून त्यांच्याकडून बादली हिसकावून घेतली. व पुन्हा टेबलावर ठेवली. या घडल्या प्रकरणात खंदारेंनी पालिकेच्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसमोर असभ्या वर्तन करून शासकीय कामात अडथळा आणला.

यापूर्वीही विनोद खंदारेंनी महिला कर्मचाऱ्यांशी शासकीय कामकाज करत असताना उद्धट वर्तन केले होते. परंतु खंदारेंच्या भीतीने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. खंदारे पालिकेत आल्यानंतर वारंवार कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून दमदाटी करून दहशतीचे वातावरण निर्माण करतात, असेही उप मुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर